Shreyas Talpade: कार्डिॲक अटॅकनंतर अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं? सांगितला थरारक अनुभव

Shreyas Talpade: कार्डिॲक अटॅकनंतर अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं? सांगितला थरारक अनुभव

Shreyas Talpade Talks About His Heart Attack: बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade ) सध्या चर्चेत आहे. श्रेयस अनेक उत्तम चित्रपटांचा भाग आहे. (Heart Attack) सध्या तो ‘वेलकम टू द जंगल’मुळे (Welcome to the Jungle) जोरदार चर्चेत आहे. आता नुकतचं श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता.

‘वेलकम टू जंगल’च्या शूटिंगदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि 14 डिसेंबर 2023 रोजी त्यांना घरीच हृदयविकाराचा झटका आला. अभिनेता सध्या रुग्णालयातून घरी परतला असून तो विश्रांती घेत आहे. त्याच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. हार्ट अटॅक आल्यानंतर नेमकं काय घडलं? दरम्यान, अभिनेता श्रेयस तळपदेनं स्वत: थरारक अनुभव सांगितला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)


अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा तो वैद्यकीयदृष्ट्या मृत झाला होता. त्याची पत्नी दीप्तीने हालचाली केल्याने त्याचा जीव वाचला हे देखील त्याने सांगितले आहे.

श्रेयस तळपदेने नुकतचं टाईम्स नेटवर्कला सांगितले की, ‘जेव्हा मी ‘वेलकम टू द जंगल’च्या सेटवरून घरी परतत होतो, तेव्हा मला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि माझ्या डाव्या हाताला दुखू लागले होते. म्हणून मी हा स्नायूंचा ताण मानला कारण आर्मी ट्रेनिंगचं शूटिंग सुरु होता आणि त्यामुळे पाण्यात पडणं, दोरीवरून उड्या मारणं असं सर्वकाही करत होतो. पण अचानक शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेताना खूप त्रास जाणवला. माझा हात प्रचंड दुखू लागला होता.मात्र, शेवटच्या शॉटनंतर मला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मी माझ्या व्हॅनिटी व्हॅनपर्यंत पोहोचू शकलो नाही. कपडे बदलण्यातही अडचण येत होती.

अभिनेता पुढे म्हणाला की, ‘कारमध्ये बसून मला वाटले की मी थेट हॉस्पिटलमध्ये जावे, पण मी आधी घरी गेलो. माझी पत्नी दीप्ती हिने मला त्या अवस्थेत पाहिल्याबरोबर पुढच्या 10 मिनिटांत मला हॉस्पिटलमध्ये नेले. मी गेट पण पाहिलं, पण तिथे बॅरिकेड होता. आम्हाला यू टर्न घ्यावा लागला. मग माझा चेहरा सुन्न झाला. मी बेशुद्ध पडलो होतो. हा हृदयविकाराचा झटका होता. माझ्या हृदयाचे ठोके काही मिनिटांसाठी थांबले. तो वैद्यकीयदृष्ट्या मृत झाला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच काही लोक आले आणि मला लगेच आत नेण्यात आले. डॉक्टरांनी मला सीपीआर, शॉक दिले, त्यानंतर माझे हृदय पुन्हा धडधडू लागले. हे माझे दुसरे आयुष्य आहे. जीवन असेल तर जग आहे. गेल्या 28 वर्षांपासून मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे.

दिवसेंदिवस किंग खानच्या ‘डंकी’ची बिकट परिस्थिती, 13व्या दिवशी निम्म्याहून कमी कमाई

श्रेयस तळपदे हे बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमधील एक मोठे नाव आहे. त्याने ‘इकबाल’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल 3’, ‘हाऊसफुल 2’ आणि ‘गोलमाल अगेन’ सारख्या अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने ‘द लायन किंग’ आणि ‘पुष्पा’ या हॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला आवाज दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube