Download App

Double iSmart: ‘लाइगर’ नंतर पुरी जगन्नाथ घेऊन आले; आयस्मार्ट शंकरचा सिक्वल, मुंबईत शूटिंग सुरू…

Double iSmart : उस्ताद राम पोथिनेनी आणि पुरी जगन्नाथ यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. यावेळी ते आयस्मार्ट शंकरचा सिक्वेल डबल आयस्मार्ट हा चित्रपट घेऊन येत आहेत. मुंबईत या चित्रपटाचं शूटींगही सुरू झालं आहे. हा चित्रपट पॅन इंडियामध्ये रिलीज होणार आहे. तर हॉलिवूडचे सिनेमॅटोग्राफर जियानी जियानेली या चित्रपटासाठी काम करत आहेत. (After leaguer Puri Jagnanath presets Double iSmart )

‘एकनाथ शिंदेंना अर्थमंत्री करा अन् अजितदादांना’.. ठाकरे गटाच्या नेत्याने दिला भन्नाट फॉर्म्युला

गेल्या काही दिवसांपासून पॅन इंडियामधील चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढली आहे. यामध्ये साऊथच्या चित्रपटांची संख्या जास्त आहे. त्यांचा प्रत्येत बहुचर्चित चित्रपट पॅन इंडियामधील चित्रपटगृहांमध्ये रिलीज केला जात आहे. त्यात आता आयस्मार्ट शंकरचा सिक्वेल डबल आयस्मार्ट हा चित्रपट देखील सामील झाला आहे.

Video : पुरामुळे नागरिकांचे हाल! संतप्त महिलेने आमदाराच्या थेट कानशिलातच लगावली…

या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करत आहेत. त्यांनी हिंदीतही चित्रपट बनवले आहेत. तर आइस्मार्ट फ्रेंचाईजीमध्ये उस्ताद राम पोथिनेनी लीड रोलमध्ये आहेत. चित्रपटाची निर्मिती पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर करत आहेत. चित्रपटामध्ये अॅक्शन सीन्स केचा कोरिओग्राफ करत आहेत. तर सिनेमॅटोग्राफी हॉलिवूडचे सिनेमॅटोग्राफर जियानी जियानेली करणार आहेत.

हा चित्रपट पुढच्या वर्षी 8 मार्चला महाशिवरात्रीच्या दिवशी रिलीज होणार आहे. तर तमिळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित इस्मार्ट शंकर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. राम या चित्रपटाचा मुख्य अभिनेता होता. रामचे पात्र शंकर हा एक स्ट्रीट स्मार्ट मारेकरी असल्याचे दाखवण्यात आले आहे. जो एका मारलेल्या सीबीआय अधिकाऱ्याच्या आठवणींना तांत्रिकदृष्ट्या स्मार्ट आणि प्रगत बनवतो. चार्मी कौरने या चित्रपटाची सहनिर्मितीही केली होती. कलाकारांमध्ये राम व्यतिरिक्त सत्यदेव, नभा नतेश आणि निधी अग्रवाल यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

Tags

follow us