Download App

Siddharth Jadhav ‘सुस्साट’ : नवा चित्रपट, लंडनमध्ये शुटिंगला सुरुवात

Siddharth Jadhav : ‘अफलातून’ चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव आता पुढील चित्रपटाच्या शुटींगला लागला आहे. लवकरच हा देखील मराठी सिनेमा चाहत्यांच्या  भेटीला येणार आहे. हा एक धम्माल हॉरर कॉमेडी सिनेमा (Horror comedy movies) असल्याचे सांगितले जात आहे. लंडनमध्ये (London) नुकतंच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा प्रथमेश परब आणि सिद्धार्थ जाधव एकत्र विनोदाची आतिषबाजी करत असल्याचे दिसून येणार आहेत. (After the best response to Aflatoon movie actor Siddharth Jadhav is now shooting for his next movie in london)

‘सुस्साट’ सिनेमाच्या कथेत अनेक विचित्र योगायोग आणि त्यामुळे उडणारी धम्माल रुपेरी पडद्यावर बघण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. ‘सुस्साट’ हा हॉरर कॉमेडी सिनेमा अंबर विनोद हडप यांनी लिहिली आहे, तर विशाल देवरुखकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळायचे पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब यांच्याबरोबर अभिनेत्री विदुला चौगुले पहिल्यांदा हटके भूमिकेमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधल्याचे दिसले आहे. विजय केंकरे आणि शुभांगी लाटकर यांच्यासारखे हटके कलाकार देखील या सिनेमात महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना पाहायला मिळणार आहे.

मला त्याने डेट करण्याची विनवणी केली, कंगना रनौतने घेतले ‘या’ अभिनेत्याचे नाव

या सिनेमाच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एका जुनाट प्रथेचा पर्दाफाश हटके पद्धतीने केला जाणार आहे. ‘सुस्साट’ या विनोदी सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी अमित बसनीत, प्रजय कामत आणि स्वाती खोपकर यांनी उचल्याचे बघायला मिळणार आहे. तर सिनेमाचे सह-निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन, तबरेज पटेल, सनिस खाकुरेल हे आहेत. सिनेमाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांच्याकडे देण्यात आली आहे. कुणाल करण या हटके सिनेमाचे संगीतकार असल्याचे दिसत आहेत.

Tags

follow us

वेब स्टोरीज