Marathi Movie : वाळवीच्या यशानंतर ‘वाळवी 2’ ची घोषणा

मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाने अत्यंत हिट झाला. त्यानंतर आता (वाळवी) च्या यशानंतर ‘वाळवी 2’ ची घोषणा करण्यात आली. सध्या या चित्रपटाचा चौथा आठवडा सुरू आहे मात्र अजून देखील प्रेक्षकांची गर्दी खेचून आण्यात हा चित्रपट यशस्वी ठरत आहे. हेच यश साजरे करण्यासाठी आणि परेश मोकाशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन […]

Untitled Design   2023 02 07T150055.962

Untitled Design 2023 02 07T150055.962

मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाने अत्यंत हिट झाला. त्यानंतर आता (वाळवी)

च्या यशानंतर ‘वाळवी 2’ ची घोषणा करण्यात आली. सध्या या चित्रपटाचा चौथा आठवडा सुरू आहे मात्र अजून देखील प्रेक्षकांची गर्दी खेचून आण्यात हा चित्रपट यशस्वी ठरत आहे. हेच यश साजरे करण्यासाठी आणि परेश मोकाशी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ‘वाळवी 2’ ची घोषणाही करण्यात आली. मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी आणि झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांनी लवकरच ‘वाळवी 2’ घेऊन येत असल्याचे जाहीर केले.

दिग्दर्शक परेश मोकाशी आणि लेखक, निर्माती मधुगंधा कुलकर्णी म्हणतात. ‘हा चित्रपट प्रेक्षकांना आवडतोय. त्यांच्याकडून चित्रपटाबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळेच आम्हाला ‘वाळवी 2′ ची प्रेरणा मिळाली.’

झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘या यशात दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील संपूर्ण टीम यांच्यासोबतच मीडियाचाही तितकाच सहभाग आहे. मीडियाने वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत वाळवीला पोहोचवले. लवकरच आता ‘वाळवी 2′ हा थ्रीलकॅाम घेऊन तुमच्या भेटीला येऊ.’

या सिनेमात कोण कलाकार असणार इथूनच हा सस्पेन्स सुरू होतो. असून दिसतं तसं नसतं अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘वाळवी 2′ मध्येही असेच गुपित दडलेले असून, जे लवकरच उलगडेल.’

Exit mobile version