Download App

Miss World 2023 स्पर्धा होणार काश्मीरमध्ये; तब्बल 27 वर्षांनी देशाकडे स्पर्धेचे यजमानपद

Miss World 2023: ७१ वी मिस वर्ल्ड स्पर्धा (Miss World 2023) ही काश्मीर येथे होणार आहे. १४० देशांमधील स्पर्धक यावेळी स्पर्धेक म्हणून भाग घेणार आहेत. मंगळवारी (२९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये एका पत्रकार परिषदेचे माहिती देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड २०२३ या स्पर्धेबद्दल चर्चा देखील करण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलाव्स्की, मिस इंडिया सिनी शेट्टी, मिस वर्ल्ड कॅरिबियनएमी पेना आणि मिस वर्ल्ड इंग्लंड जेसिका गगेन आणि मिस वर्ल्ड अमेरिका श्री सैनी आणि मिस एशिया प्रिसिलिया कार्ला सपुत्री युलेस याची देखील उपस्थिती होती.

“काश्मीर हे मिस वर्ल्डसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे. या ठिकाणी सर्व काही गोष्टी आहे. देशातील हे सुंदर ठिकाण आणि येथील सुंदर तलाव मी बघितले आहे. सर्वांनी आमचे छान स्वागत देखील केले आहेत. येथे आम्हाला मिळालेला पाहुणचार खूपच अप्रतिम होता. या स्पर्धेमध्ये १४० देश सहभागी होत असताना हे बघणं खूपच रोमांचकारी ठरणार आहे. प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे सौंदर्य असते. परंतु येथील सुखद आदरातिथ्य जबरदस्त आहे.’ असं कॅरोलिना बिलाव्स्कीनं पत्रकार परिषदेमध्ये यावेळी सांगितले आहे.

मिस इंडिया सिनी शेट्टी ती देखील पत्रकार परिषदेत सांगितली आहे की, “मिस वर्ल्ड २०२३ काश्मीरमध्ये होणार आहे हा क्षण खूपच अभिमानाचा आहे. हा क्षण दिवाळी सणासारखा राहणार आहे, कारण १४० देश भारतात येत आहेत आणि एक कुटुंब म्हणून स्पर्धेत सहभागी राहणार आहेत. रुबल नागी आर्ट फाऊंडेशनचे रुबल नागी आणि देशातील पीएमई एंटरटेनमेंटचे अध्यक्ष जमील सैदी हे देखील या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. मिस वर्ल्ड अमेरिका, श्री सैनी आणि ज्युलिया मोर्ले, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या चेअरपर्सन आणि सीईओ हे काश्मीर दौऱ्यामध्ये सोबतीला होते. तसेच जवळपास ३ दशकांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धेचा यजमानपदाची जबाबदारी देशाकडे सोपवण्यात आली आहे.

‘The Kashmir Files’चे दिग्दर्शक इंडस्ट्री सोडणार? बॉलिवूडबद्दल विवेक अग्निहोत्रींचं मोठं भाष्य

१९९६ मध्ये देशामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची मिस वर्ल्ड स्पर्धा ही सामाजिक कार्यांना उत्तेजन देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. ऐश्वर्या राय- बच्चन, प्रियंका चोप्रा, युक्ता मुखी या देशाच्या लेकींनी आतापर्यंत या सन्मावर स्वतःचे नाव कोरले आहे. तसेच नोव्हेंबर किंवा डिसेंबर २०२३ मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. स्त्रियांच्या सौंदर्य आणि बुद्धीचा गौरव करणे हा मिस वर्ल्ड या किताबाचा मुख्य हेतू राहणार आहे.

Tags

follow us