Download App

नव्या पिढीला होणार लोककलेची ओळख, नरेंद्र फिरोदियांनी हाती घेतला ‘Folkवंत’ उपक्रम

Narendra Firodia : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 351 वर्षे पूर्ण झाल्याने, इतिहासाच्या सुवर्ण अध्यायातील तो

  • Written By: Last Updated:

Narendra Firodia : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणारी ‘अहिल्यानगर महाकरंडक 2025’ या एकांकिका स्पर्धा आजपासून शहरातील सावेडी भागातील माऊली सभागृहात सुरू झाली आहे. अहिल्यानगर महाकरंडक 2025 (Ahilyanagar Mahakarandak) मध्ये अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचे अध्यक्ष तथा ‘आय लव्ह नगर’चे (I Love Nagar) संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांनी ‘Folkवंत’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचे उद्घाटन प्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला.

लेट्सअप मराठीशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 351 वर्षे पूर्ण झाल्याने, इतिहासाच्या सुवर्ण अध्यायातील तो अभिमानाचा क्षण आपण रंगभूमीच्या रणभूमीवर साजरा करत आहोत. शिवरायांनी लोककलेला कायमच राजाश्रय दिला. त्यामुळे महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा वाढीस लागली. मात्र, आजच्या डिजिटल युगात मराठमोळ्या परंपरांचा वारसा जपणाऱ्या त्या लोककला नष्ट होण्याच्या धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच मराठी लोकसंस्कृतीचा अभिमान जोपासणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही ‘Folkवंत’ या अभिनव लोककला चळवळीची आजपासून सुरुवात करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे बोलताना नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, ‘फोकवंत’ हे लोककलांचा प्रचार अन् प्रसार करण्याचं हे खुलं व्यासपीठ असणार आहे. ज्याद्वारे राज्यभरातील कलाकारांना आपल्या कला बिनदिक्कत सादर करता येतील. महाराष्ट्रातील लोककला या महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘Folkवंत ‘ हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे. यातून नव्या कलाकारांना व्यासपीठ देणे, नव्या पिढीला या लोकपरंपरा, लोकवाद्ये, लोककलेची ओळख करून देणे आदी कामे होणार असल्याची देखील माहिती त्यांनी दिली.

मोठी बातमी! न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची बीसीसीआय लोकपाल म्हणून नियुक्ती

यावेळी चित्रपद अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, दिग्दर्शक आशिष वाघ, दिग्दर्शक मयूर हरदास, अहिल्यानगर महाकरंडक स्पर्धेचे संयोजक स्वप्नील मुनोत, महावीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल बोरा, सोहम ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अमित बुरा, आय लव्ह नगरच्या व्यवस्थापिका विशाखा पितळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

follow us