मोठी बातमी! न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची बीसीसीआय लोकपाल म्हणून नियुक्ती

  • Written By: Published:
मोठी बातमी! न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची बीसीसीआय लोकपाल म्हणून नियुक्ती

Justice Arun Mishra :  बीसीसीआयचे (BCCI) नवे लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी न्यायाधीश अरुण मिश्रा (Arun Mishra) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माहितीनुसार, माजी न्यायाधीश अरुण मिश्रा बीसीसीआयचे नीतिमत्ता अधिकारी म्हणूनही काम पाहणार आहे.

अरुण मिश्रा यांनी 7 जुलै 2014 ते 2 सप्टेंबर 2020 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांची 2 जून 2021 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे (NHRC) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 1 जून 2024 पर्यंत ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे काम पाहत होते. अरुण मिश्रा यांचा जन्म 3 सप्टेंबर 1955 रोजी ग्वाल्हेर येथे झाला असून त्यांनी मध्य प्रदेश, राजस्थान आणि कलकत्ता उच्च न्यायालयांचे न्यायाधीश म्हणून काम पाहायले आहे.

25 ऑक्टोबर 1999 रोजी त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि नंतर 26 नोव्हेंबर 2010 रोजी राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 14 डिसेंबर 2012 रोजी त्यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

घरच्यांनी वेडा म्हणून सोडलं अन् बनारसमध्ये वेगळंच घडलं… स्टोरी जाणून व्हाल थक्क

follow us
  • fb
  • instagram
  • youtube