जशी कामगिरी तसा पैसा! प्रकरण गंभीर, खेळाडूंना आर्थिक भुर्दंड; BCCI कठोर निर्णय घेणार?

जशी कामगिरी तसा पैसा! प्रकरण गंभीर, खेळाडूंना आर्थिक भुर्दंड; BCCI कठोर निर्णय घेणार?

BCCI on Indian Players : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी अतिशय (Team India) निराशाजनक राहिली. कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली आणि अन्य दिग्गज अपयशी ठरले. या कामगिरीनंतर भारतीय संघातील धुसफूसही समोर आली होती. चौफेर टीकाही झाली होती. आता यानंतर टीम इंडियाला इंग्लंड सिरीज आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत (Champions Trophy) खेळायचं आहे. या स्पर्धेआधी भारतीय संघ कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करील.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर खेळाडू्ंच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत रोहित शर्मा, हेड कोच गौतम गंभीर, चीफ सिलेक्टर अजित आगरकर उपस्थित होते. या दरम्यान अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या पैशांचाही मुद्दा होता.

चॅम्पियन्स ट्रॉफीत विघ्न? पाकिस्तानने आयसीसीला दिली नवी डेडलाइन; नेमकं काय घडलं..

जसे काम तसे दाम

यानंतर आता बीसीसीआय लवकरच कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यानुसार खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर मानधन मिळेल. परंतु, हा निर्णय लागू करण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचे योगदान वेगवेगळे असते. कधीकधी खराब कामगिरी एखाद्या खेळाडू ऐवजी संघाच्या प्रयत्न कमी पडल्यानेही होऊ शकते.

या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील

फलंदाजांचं अपयश गोलंदाजांची कामगिरी किंवा खेळपट्टीच्या स्थितीमुळे देखील असू शकते. या व्यतिरिक्त खेळाडूंवर आर्थिक दबाव टाकल्यास त्यांची मानसिक स्थिती प्रभावित होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवरही होऊ शकतो. या संभाव्य शक्यता पाहता नवा नियम लागू करतेवेळी खेळाडूंची स्थिती, संघाची सामूहिक भावना आणि मानसिक आरोग्य या गोष्टींचा विचार झाला पाहिजे.

Border-Gavaskar Trophy : सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? ट्रॉफी प्रदान करण्यासाठी केवळ बॉर्डर यांनाच बोलविले !

follow us
  • fb
  • instagram
  • youtube