Shaitaan Advance Booking Day 1: यामी गौतमचा (Yami Gautam) ‘आर्टिकल 370’ (Article 370) बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. रिलीजच्या 10 दिवसांत या सिनेमाने बजेटपेक्षा तिप्पट कमाई केली आहे. आता अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर ‘शैतान’ (Shaitaan Movie) देखील थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या हॉरर थ्रिलर चित्रपटाची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. या सगळ्यात सिनेमाची ॲडव्हान्स बुकिंग जोरदार सुरु झाली आहे. पहिल्या दिवसाच्या ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘शैतान’ने आतापर्यंत किती कलेक्शन केले चला तर मग जाणून घेऊया.
‘शैतान’ सिनेमाचे किती ॲडव्हान्स बुकिंग झाले? शैतानचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. यापूर्वी, चित्रपटासाठी प्री-तिकीट बुकिंग मर्यादित ठिकाणी उघडण्यात आले होते, परंतु अलीकडे ऑनलाइन तिकीट-बुकिंग प्लॅटफॉर्मवर आणखी काही शो जोडले गेले आहेत. पहिल्या दिवसाच्या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगचे आकडेही आले आहेत. SACNILC च्या अहवालानुसार, पहिल्या दिवशी देशभरात ‘शैतान’ची 15 हजार 145 तिकिटे हिंदीमध्ये 2D स्वरूपात बुक करण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटाने 37.41 लाख रुपये कमवले आहेत. सध्या चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून पाच दिवस बाकी असून या काळात ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘शैतान’ चांगला कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे.
Here’s a list of things you should do to ensure that kisi #Shaitaan ki nazar aap par asar na kar paaye!
Book your tickets now!
Taking over cinemas on 8th March 2024.@ajaydevgn @ActorMadhavan #Jyotika @imjankibodiwala #JyotiDeshpande @KumarMangat… pic.twitter.com/VxsYHGPVIW
— Jio Studios (@jiostudios) March 4, 2024
‘शैतान’च्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद: नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘दृश्यम 2’ च्या सुपर यशानंतर अजय देवगणने पुन्हा एकदा ‘शैतान’मध्ये फॅमिली मॅनच्या भूमिकेत पुनरागमन केले आहे, तर आर माधवनने भयंकर खलनायकाच्या भूमिकेत सर्व प्रसिद्धी मिळवली आहे. एकूणच, ट्रेलरनंतर या चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगली आहे.
Prerna Arora: निर्माती प्रेरणा अरोरा ‘डंक’ सिनेमाबद्दल म्हणाली, ‘भू-माफिया आणि…’
‘शैतान’ स्टार कास्ट: ‘शैतान’ चे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले आहे. याआधी बहलने ‘क्वीन’ आणि ‘सुपर ३०’ सारखे चित्रपटही दिग्दर्शित केले होते. ‘शैतान’च्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगर आणि आर माधवन व्यतिरिक्त या चित्रपटात ज्योतिका, जानकी बोडीवाला आणि अंगद राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओ, पॅनोरमा स्टुडिओ आणि देवगण फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली आहे. हा चित्रपट 8 मार्चला प्रदर्शित होत आहे.