Shaitaan Box Office Collection Day 1: अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर चित्रपट ‘शैतान’ (Shaitaan Movie) 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये दोन्ही स्टार्सच्या अभिनयाने चाहत्यांची आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा एक हॉरर ड्रामा चित्रपट आहे. (Box Office) अँडवान्स बुकिंगच्या बाबतीतही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याने जगभरात चांगली कामगिरी केली आहे.
‘शैतान’ हा गुजराती चित्रपट ‘वश’चा हिंदी रिमेक आहे. या सगळ्यात आता चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा अहवाल समोर आला आहे. चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने एकून किती कमाई केली जाणून घ्या…
SACNL च्या सुरुवातीच्या ट्रेंडच्या अहवालानुसार, अजय देवगण आणि आर माधवन स्टारर चित्रपटाने पहिल्या दिवशी 14.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यामध्ये बदल होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अजय देवगणच्या चित्रपटाने ‘राझ 3’ हॉरर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘शैतान’पूर्वी, इमरान हाश्मी, बिपाशा बसू आणि ईशा गुप्ता अभिनीत चित्रपट हा बॉलिवूडचा सर्वात मोठा हॉरर ओपनर होता. 10.33 कोटींनी ओपन केले. अशा परिस्थितीत ‘शैतान’या चित्रपटाचा विक्रम मोडून हॉरर चित्रपटांचा नवा विक्रम केला आहे.
पहिल्या दिवशी 3844 शो मिळाले: शिवाय अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्ट्समध्ये ते 60-65 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत ओपनिंग कलेक्शन पाहता हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर आपले बजेट वसूल करेल असा अंदाज लावला जात आहेत.’शैतान’ला पहिल्या दिवशी 3844 शो मिळाले आहेत.
Women Day: चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणाऱ्या महिला निर्मात्या माहितीय का?
2024 मधील हिंदी ओपनर चित्रपट: सोबतच बॉलिवूडच्या बॉक्स ऑफिस रिपोर्टबद्दल बोलायचे झाले तर 2024 मध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट ओपनिंग म्हणजे हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘फाइटर’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 24.60 कोटी रुपयांचे खाते उघडले. यानंतर शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 7.02 कोटींची कमाई केली होती. आता यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ चित्रपट आला, ज्याने 6.12 कोटी रुपयांची सुरुवात केली आणि अजूनही चांगली कमाई केली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडवर विश्वास ठेवला तर ‘शैतान’ हा ‘फायटर’ नंतरचा या वर्षातील दुसरा मोठा सिनेमा मानला जात आहे.