Ajay Devgan : चार वर्षानंतर सिंघम अभिनेता ‘मैदान’ मारण्यास सज्ज, जाहीर केली रिलीज डेट

Ajay Devgan : चार वर्षानंतर सिंघम अभिनेता ‘मैदान’ मारण्यास सज्ज, जाहीर केली रिलीज डेट

Maidaan Trailer Kick off Tomorrow: अजय देवगण (Ajay Devgan) सध्या ‘शैतान’ (Maidaan Trailer) चित्रपटामुळे चर्चेत आहे. 8 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याद्वारे तो अभिनेता आर माधवन (R Madhavan) आणि अभिनेत्री ज्योतिकासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतच त्याचा आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे.

2024च्या ईदच्या मुहूर्तावर अभिनेत्याचा ‘मैदान’ सिनेमा येणार आहे. चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता त्याचा टीझर रिलीज झाला असून, त्यासोबतच ट्रेलर रिलीजही जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत आणि आधीच त्याला पुरस्कार विजेते घोषित केले आहे.

झी स्टुडिओवरून ‘मैदान’ चा टीझर रिलीज करण्यात आला आहे. या 36 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काही मुलं रेल्वे यार्डमध्ये फुटबॉल खेळत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचदरम्यान अजय देवगण तिथे आला. फुटबॉल त्याच्याकडे जातो आणि तो एक किक घेतो. यानंतर व्हिडिओ संपतो. यामध्ये अभिनेत्याची शैली आत्तापर्यंत साकारलेल्या पात्रांपेक्षा अनोखी आहे. तो पॅन्ट आणि शर्टमध्ये चांगला पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. या टीझरचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

‘मैदान’च्या टीझरवर चाहत्यांच्या प्रतिक्रियांबद्दल बोलायचे झाले तर, एका व्यक्तीने लिहिले, ‘अजय देवगण यावर्षी पुनरागमन करत आहे.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘परफेक्ट चित्रपट लवकरच येत आहे.’ तर तिसऱ्याने लिहिले, ‘तुम्हाला खरे सांगतो. या चित्रपटातील अजय सरांचा अभिनय पुरस्कार विजेता आहे.’ तर आणखी एका यूजरने, ‘आणखी एक उत्कृष्ट नमुना.’ यासोबतच दुसऱ्याने लिहिले, ‘नंबर वन मेगास्टार अजय देवगण. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार आहे. असा भन्नाट कॉमेंट्स सध्या मिळत आहेत.

सनी लिओनीलाही ‘नवरोबा’ची भुरळ, कन्नी सिनेमातल्या गाण्यावरचा भन्नाट डान्स पाहा

अजय देवगणच्या ‘मैदान’चा ट्रेलर या दिवशी रिलीज होणार आहे. ‘मैदान’च्या टीझरसोबतच त्याचा ट्रेलर रिलीजही जाहीर करण्यात आला आहे. टीझरच्या शेवटी असे म्हटले आहे की, चित्रपटाचा ट्रेलर उद्या म्हणजेच 7 मार्च रोजी येणार आहे. त्याच वेळी, 2024 च्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाशी त्याची स्पर्धा होणार आहे. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये कोण बाजी मारतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

‘मैदान’चे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे. हा एक चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 1952 ते 1962 हा फुटबॉलचा सुवर्णकाळ यात दाखवण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज