सनी लिओनीलाही ‘नवरोबा’ची भुरळ, कन्नी सिनेमातल्या गाण्यावरचा भन्नाट डान्स पाहा

सनी लिओनीलाही ‘नवरोबा’ची भुरळ, कन्नी सिनेमातल्या गाण्यावरचा भन्नाट डान्स पाहा

Sunny Leone Dance: ‘कन्नी’ या (Kanni Movie) चित्रपटाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. चित्रपटाच्या टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी अनेकांना वेड लावले आहे. प्रत्येक गाण्याचा जॉनर अनोखा असून सर्वानाच गाण्यांवर संगीतप्रेमी प्रेम करत आहेत. (Marathi Movie) यातील विशेष गाजलेले गाणे म्हणजे ‘नवरोबा’ (Navroba Song). या गाण्यावरील अनेक रील्स सध्या सोशल मीडियावर (social media) जोरदार व्हायरल होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


यातील हूकस्टेपही प्रचंड गाजत आहे आणि याचीच भुरळ बॉलिवूडच्या (Bollywood) सनी लिओनीला (Sunny Leone) पडली आहे. ‘नवरोबा’ गाण्यावरील सनीचे हे नृत्य सोशल मीडियावर प्रचंड गाजत असल्याचे दिसत आहे. सनी हे गाणे एन्जॉय करतेय,असे एकंदर तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. दरम्यान, समीर जोशी लिखित, दिग्दर्शित ‘कन्नी’ चित्रपट येत्या 8 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात ऋता दुर्गुळे, अजिंक्य राऊत, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी यांनी केली आहे.

यावर दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे ‘कन्नी’ करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणारी एक ‘कन्नी’ असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचे महत्व आपल्याला कळते. या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा. ही ‘कन्नी’ सर्वांना एकत्र बांधण्यासाठी 8 मार्चपासून चित्रपटगृहात येणार आहे.

तुटलेले दात, चेहऱ्यावर चिखल; आमिरचा आगामी सिनेमातला लूक पाहिलात का? डोळ्यांवर विश्वास नाही बसणार

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ‘पोस्टर जरी तरुणाईला आकर्षित करणारे असले तरी हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी आहे. मैत्री, प्रेम आणि स्वप्ने ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. या सगळ्यांना जोडणाऱ्या ‘कन्नी’ची गोष्ट प्रेक्षकांना चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांसाठी खास हे नवीन पोस्टर आणले आहे त्यासोबतच पतंग उडवून मकर संक्रांत साजरीही केली. खूप धमाल केली. अशीच धमाल प्रेक्षकांना चित्रपट पाहतानाही येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज