तान्हाजी’चा शिवरायांना मुजरा! अजय देवगणची स्टोरी चर्चेत, शिवरायांच्या गाथेला बॉलिवूडचा मानाचा मुजरा

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

Untitled Design (39)

Untitled Design (39)

Ajay Devgan’s story is in the news : मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा बहुप्रतिक्षित आणि महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अलीकडेच सोशल मीडियावर या चित्रपटाची झलक (टीझर) समोर येताच प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टीतही या प्रकल्पाबाबत उत्सुकता निर्माण झाली. या झलकनंतर अनेक दिग्गज कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

*‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’*मधून मराठ्यांच्या शौर्यगाथेला मोठ्या पडद्यावर साकारलेला अजय देवगण, आता *‘राजा शिवाजी’*च्या पोस्टवरून पुन्हा एकदा शिवरायांना मानाचा मुजरा करताना दिसला. अजय देवगण यांनी त्यांच्या सोशल मीडिया स्टोरीवर चित्रपटाचा व्हिज्युअल शेअर करत “Tanhya cha naman, Raje 🙏 This looks incredible!” असे म्हणत चित्रपटाच्या भव्यतेचे कौतुक केले. यासोबतच “Wishing you nothing but glory for #RajaShivaji… जय शिवराय 🚩” अशा शब्दांत त्यांनी रितेश विलासराव देशमुख आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

सामान्य लँडिंगपेक्षा ‘हार्ड लँडिंग’ वेगळी कशी असते? वाढलेला वेग, वर्टिकल स्पीड आणि सुरक्षेचं गणित समजून घ्या

अजय देवगण यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली असून, चाहत्यांकडून या प्रतिक्रियेला ‘तान्हाजीकडून शिवरायांना दिलेला मानाचा मुजरा’ असे संबोधले जात आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ‘छावा’ चित्रपटातून संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशल यांनीही “आबासाहेब 🙏🔥🚩” अशी कमेंट करत शिवरायांना आदरांजली वाहिली होती.

सोशल मीडियावर या पोस्ट्सना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून, नेटकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांकडून मिळणारा हा पाठिंबा पाहता, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस आता अधिकच शिगेला पोहोचली आहे.

Exit mobile version