Housefull 5: खिलाडी अन् साजिद नाडियाड पुन्हा एकत्र दिसणार, ‘हाऊसफुल 5’दिवाळीत होणार प्रदर्शित

Housefull 5: खिलाडीच्या एका मोठ्या घोषणेने ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) फ्रँचायझीचे चाहते उत्साहित झाले आहेत, बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच सर्वांचा लाडका खिलाडीच्या पाचव्या पार्टसाठी निर्माता साजिद नाडियादवालाबरोबर (Sajid Nadiadwala) पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी ‘हाऊसफुल 5’ ची घोषणा केली आहे. Get ready for FIVE times the madness! 💥 […]

Housefull 5

Housefull 5

Housefull 5: खिलाडीच्या एका मोठ्या घोषणेने ‘हाऊसफुल 5’ (Housefull 5) फ्रँचायझीचे चाहते उत्साहित झाले आहेत, बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच सर्वांचा लाडका खिलाडीच्या पाचव्या पार्टसाठी निर्माता साजिद नाडियादवालाबरोबर (Sajid Nadiadwala) पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी ‘हाऊसफुल 5’ ची घोषणा केली आहे.

जो पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ‘दोस्ताना’ फेम तरुण मनसुखानी हे करणार आहेत. नाडियादवाला आणि अक्षय कुमार यांनी एकत्र बॉक्स ऑफिसवर एकपेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत आणि ‘हाऊसफुल’ मालिकेने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे. या सिनेमामध्ये खिलाडीसोबत प्रतिभावान अभिनेता रितेश देशमुख देखील दिसणार आहे.

तसेच फ्रँचायझीचा तिसरा भाग २०१६ मध्ये रिलीज करण्यात आला होता. सिनेमाचे कथानक एका श्रीमंत व्यावसायिकासोबत केंद्रित होते. अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या या माणसाला त्याच्या ३ मुलींचे लग्न होऊ नये असे वाटत असते. त्यानंतर त्या तिघींच्या बॉयफ्रेंडने सिद्ध करायचे होते की, ते त्या मुलींसाठी कितपत योग्य आहेत. फरहाद सामजी आणि साजिद खान यांनी तिसऱ्या भागाचे दिग्दर्शन करण्यात आले होते.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

परंतु आता चौथा भाग २०१९ मध्ये रिलीज करण्यात आला. चौथ्या भागासाठी, या संकल्पनेला कॉमिक टच जोडला गेला होता. तीन भावांची, तीन बहिणींशी लग्न होणार असतात. परंतु भूतकाळ आणि वर्तमान काळ यांच्यामध्ये अडकल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु खिलाडी आता नवीन काय घेऊन येणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version