Download App

Akshay Kumar सरफिराचे एकामागून एक गाणे रिलीज; दे ताली गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Akshay Kumar च्या सरफिराचे एका मागून एक गाणे रिलीज होत आहेत. त्यात आता या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Akshay Kumar Film Sarfira song De Taali Release : अक्षय कुमार (Akshay Kumar ) म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी कुमार त्याच्या आगामी चित्रपट ‘सरफिरा’साठी (Sarfira Movie) तयारी करत आहे. यामध्ये या चित्रपटाचे एका मागून एक गाणे रिलीज होत आहेत. त्यात आता या चित्रपटातील आणखी एक गाणं (song Release) प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. दे ताली (De Taali) असं या गाण्याचं नाव आहे.

Bigg Boss OTT: अनिल कपूरने केले विक्कीचे तोंडभरून कौतुक; म्हणाला, ‘भाग्यवान आहेस…’

हे गाणं श्लोक लाल यांनी लिहिलं आहे. तर तनिष्क बागची यांनी या गाण्याला संगीत दिलं असून त्यांनीच हे गाणं गायलं आहे. या गाण्यामध्ये चित्रपटाच्या नायकाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. काही तासांतच या गाण्याने रसिकांना भूरळ घातली आहे. तर या अगोदर या चित्रपटातील मार उरी, खुदाया, चावट हे तीन गाणं रिलीज झाले आहेत.

गुजरातचा अधिकारी, महाराष्ट्रात 640 एकर जमीन खरेदी; संतापलेल्या वडेट्टीवारांनी सरकारला फोडला घाम

तर सरफिरामधील अक्षय कुमारची व्यक्तिरेखा एका प्रामाणिक व्यक्तीची आहे, जी व्यवस्थेच्या विरोधात जाते, पण या प्रवासात त्याच्यासमोर अनेक अडचणींचा डोंगर उभा राहतो. हा चित्रपट 12 जुलै रोजी रिलीज होत आहे.

कथा एअरलाईन्स व्यवसायाशी संबंधित

मार उरीमध्ये एक सीन फ्लॅशबॅक देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार प्रचंड गर्दीसह विरोध करताना दिसत आहे. व्हिडिओ जसजसा पुढे जातो तसतसे अक्षयचे पात्र आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करताना दिसत आहे. क्लिपमध्ये तो डेक्कन एअरलाइन्सच्या विमानासमोर उभा असल्याचे दाखवले आहे.

हा संवाद रोचक

‘सरफिरा’च्या या गाण्यात अक्षय कुमारही एका रेडिओ स्टेशनवर बोलताना दिसत आहे. “मला केवळ खर्चाचा अडथळा नाही तर सामान्य लोकांसाठी खर्चाचा अडथळा देखील मोडायचा आहे,” तो म्हणतो. या गाण्यात परेश रावल आणि अक्षय कुमारसोबत राधिका मदनही दिसत आहे.

follow us