पाच फुटाचा बच्चन आता घरबसल्या पाहता येणार! ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला चित्रपट
Paanch Footacha Bachchan सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला पाच फुटाचा बच्चन हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल
You can now watch ‘Paanch Footacha Bachchan ‘ from your home film arrived on OTT platform : आपल्या वेगळ्या नावामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेला पाच फुटाचा बच्चन हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला असून, ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रसिक प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती.
राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी “पाच फुटाचा बच्चन” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. एकीकडे भोंदू कीर्तनकारांची चर्चा सुरू असताना, खरा कीर्तनकार कोण आणि कीर्तनपरंपरेचा मूळ गाभा काय, याचा विचार करायला लावणारा हा चित्रपट लक्षवेधी ठरतो. समता, सामाजिक जाणीव आणि संतविचारांचा संदेश देणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच प्रेक्षकांना अंतर्मुखही करतो.
भाजपसोबतचं कथित डील अन् दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण; पवार निवृत्तीचा पर्याय निवडणार?
चित्रपटातील गाणी आणि संगीत हे त्याचे आणखी एक बलस्थान आहे. एका महिला कीर्तनकाराची व्यक्तिरेखा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. श्रुती मधुदीप या अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण चित्रपटाचा तोल सांभाळला आहे. तसेच कौस्तुभ रमेश देशपांडे याची खिळवून ठेवणारी कथा आणि खुसखुशीत संवाद यासाठी प्रेक्षक खास दाद देत आहेत.
Gokul Milk : गोकुळ ‘अध्यादेशासाठी’ सरकारने मोजले तब्बल 80 लाख ; बंटी पाटील म्हणाले…
अभिनेते किशोर कदम, चिन्मयी सुमीत, शशांक शेंडे, गौरी नलावडे, क्षितीश दाते असे अनेक परिचित चेहरे या चित्रपटात आहेत. त्यांच्यासोबत नवोदित कलाकारांनीही आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. समतेची वाट दाखवणारा, आयुष्यातील नकारात्मक गोष्टी वजा करण्याची प्रेरणा देणारा आणि प्रेम व सहजीवनाचा अर्थ उलगडून सांगणारा हा चित्रपट कुटुंबासह पाहण्यासारखा आहे.