मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणून नावाजलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या फ्लॉप सिनेमांमुळे चर्चेत आहे. अक्षयचे अनेक सिनेमे एका पाठोपाठ बॉक्स ऑफिसवर आदळत आहे. नुकताच अक्षयचा सेल्फी हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही आहे. यामुळे फ्लॉप सिनेमांची संपूर्ण जबाबदारी माझी स्वतःची आहे, असे अक्षय म्हणाला आहे. तसेच सिनेमा फ्लॉप होणे ही 100 टक्के माझीच चूक असल्याचे देखील अक्षय म्हणाला आहे.
अक्षयने चूक स्वीकारली
अक्षय म्हणाला की हा खूप चांगला अलार्म आहे, जर तुमचा चित्रपट चालत नसेल तर ती तुमची चूक आहे. तुमच्यासाठी ही बदलण्याची वेळ आली आहे. चित्रपट चांगले चालत नाहीत तेव्हा प्रेक्षकांना दोष देऊ नये, असे मला सर्वांना सांगायचे आहे, असेही तो म्हणाला. चित्रपट न चालणे ही माझी 100 टक्के चूक आहे. असे म्हणत फ्लॉप सिनेमांची संपूर्ण जबाबदारी अक्षयने स्वतः घेतली आहे.
सलग 16 चित्रपट फ्लॉप
सलग 3-4 फ्लॉप चित्रपट देणारा अक्षय म्हणाला, ‘माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडत नाहीये. माझ्या चित्रपट कारकिर्दीत मी एकाच वेळी असे 16 चित्रपट दिले आहेत, जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. एक काळ असा होता की मी सलग 8 चित्रपट केले, पण तेही चालले नाहीत. आणि पुन्हा एकदा माझ्याकडे सलग तीन-चार चित्रपट आले जे चालले नाहीत. चित्रपट न चालणे हे तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे आहे. प्रेक्षक बदलले आहेत. तुम्हाला बदलण्याची गरज आहे. मला वेगळे काहीतरी करावे लागेल असे अक्षय म्हणाला.
भास्कर जाधवांचा मुख्यमंत्र्याना फोन? आमदार गोगावले म्हणाले…दोघांमधील संवादाबाबत कल्पना होती
हे चित्रपट फ्लॉप झाले
गेल्या वर्षी अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘राम सेतू’ आणि ‘बच्चन पांडे’ सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप झाले होते. आता त्याचा नवीन चित्रपट सेल्फी रिलीज झाला आहे, ज्याचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन फक्त 3.55 कोटी रुपये आहे. आणि दुसऱ्या दिवशी 3.80 कोटींची कमाई केली. अशाप्रकारे ‘सेल्फी’चे एकूण कलेक्शन 6.35 कोटी रुपये झाले आहे.