भास्कर जाधवांचा मुख्यमंत्र्याना फोन? आमदार गोगावले म्हणाले…दोघांमधील संवादाबाबत कल्पना होती

भास्कर जाधवांचा मुख्यमंत्र्याना फोन? आमदार गोगावले म्हणाले…दोघांमधील संवादाबाबत कल्पना होती

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. जाधव यांनी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभर वेळा फोन केला. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्वाचे वक्तव्य केले. कंबोज यांनी केलेला दाव्यात तथ्य आहे. तथ्य नाही असे म्हणता येणार नाही असे गोगावले म्हणाले.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाले. यातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी दावा केला की, भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना तब्बल 100 वेळा फोन करत शिंदे गटात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले, की कंबोज यांनी केलेला दाव्यात तथ्य आहे. तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. परंतु मोहित कंबोज व नरेश म्हस्के यांच्याकडे काही वेगळी माहिती असू शकते त्यानुसार त्यांनी हा दावा केला आहे.

कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले

मात्र त्यावेळी भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये संभाषण सुरु असायचे असे गोगावले म्हणाले. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, या दोघांमधील संवादाबाबत आम्हालाही कल्पना होती. मात्र आता काय आहे याबाबत माहिती नाही मात्र त्यांना शिंदे गटात सामील व्हायचे असेल तर आम्ही विचार करू, असे गोगावले म्हणाले आहे. तसेच आमचे संख्याबळ वाढेल यामुळे भास्कर जाधवांना आमच्या गटात सामील करून घेण्यासाठी आमचा कोणताही विरोध नसल्याचे देखील यावेळी गोगावले यांनी स्पष्ट केले.

Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने हादरले मेघालय, 3.2 रिश्टर स्केलची नोंद

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही
सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. मात्र कोर्टाने देखील ठाकरे गटाला सांगितले आहे की, काही गोष्टी आहेत ज्या निवडणूक आयोगामार्फतच होतील, आम्ही यामध्ये हस्तक्षेप करणार नाही. यामुळे आता कोर्टाकडून राहिलेला असलेला निर्णय देखील आमच्याबाजूनेच असेल अशी शक्यता आमदार गोगावले यांनी केली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्षाचे नाव हे दोन्ही एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यांनतर ठाकरे गटाकडून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube