Download App

OMG 2 मधील अक्षय कुमार अन् पंकज त्रिपाठी बम बम बोले लूक पाहिलात का? एकच चर्चा…

  • Written By: Last Updated:

OMG 2: अभिनेता अक्षय कुमार म्हणजेच चाहत्यांचा लाडका खिलाडी (Akshay Kumar) ‘ओएमजी 2′(OMG 2) या सिनेमासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी खिलाडीने (Khiladi ) या सिनेमाचं एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. आता खिलाडीने या सिनेमाचे आणखी २ पोस्टर्स सोशल मीडियावर (Social media) शेअर करण्यात आले आहे. यामधील एका पोस्टरमध्ये खिलाडी दिसत आहे, तर एका पोस्टरमध्ये अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे दिसून येत आहेत.


‘ओएमजी 2’ या सिनेमाच्या पोस्टरमधील खिलाडीच्या लूकने चाहत्यांचे चांगलेच लक्ष वेधले आहे. ‘बस कुछ दिनों में…’असं कॅप्शन या पोस्टरला खिलाडीने दिले आहे. पंकज त्रिपाठी यांच्या OMG-2 या सिनेमामधील लूकचा फोटो देखील खिलाडीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘मिलते हैं सच्चाई की राह पर’ असं कॅप्शन खिलाडीनं पंकज त्रिपाठी यांच्या फोटोला दिले आहे. पंकज त्रिपाठी हे ओएमजी-2 या सिनेमात कांती शरण मुद्गल ही भूमिका साकारत असल्याचे दिसून येत आहेत.

‘ओएमजी 2’ या सिनेमाचा टीझर देखील लवकरच रिलीज होणार असल्याची माहिती खिलाडीने यावेळी दिले आहे. या सिनेमाचं पोस्टर शेअर करुन चाहत्यांना याची माहिती दिली आहे. आता चाहते  ‘ओएमजी 2’ या सिनेमाच्या टीझरची खूपच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री यामी गौतम देखील ‘ओएमजी 2’ या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘ओएमजी 2’ आणि गदर-2 या सिनेमाची  बॉक्स ऑफिसवर चांगलीच टक्कर होणार असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

सनी देओलचा गदर-2 हा सिनेमा देखील 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. खिलाडीचा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘सेल्फी’ (Selfiee) हा सिनेमा फ्लॉप ठरला आहे. आता त्याच्या आगामी सिनेमाची  त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहात आहेत. आता ओह माय गॉड 2 या सिनेमाला चाहत्यांची पसंती मिळेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच चाहत्यांना मिळणार आहे.

Tags

follow us