Akshay Kumar-Vidya Balan Comedy Movie : तुम्ही शेवटचे कधी थिएटरमध्ये जाऊन मनसोक्त हसला होतात आणि खूप मजा केली होती ? या डिसेंबरमध्ये एक असा चित्रपट येत आहे जो प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देणार आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), विद्या बालन (Vidya Balan) आणि दिग्दर्शक अनीस बाझमी हे कौटुंबिक कॉमेडी चित्रपटासाठी पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. हा विनोदी चित्रपटच 4 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, अद्याप चित्रपटाचे नाव जाहीर झालेले नाही.
या चित्रपटाचे केरळमधील चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. निर्माते लवकरच अक्षय कुमारचा एक नवीन लूक किंवा फोटो शेअर करू शकतात. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि अनीस बाझमी पुन्हा एकत्र येत आहे.0 जी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेता-दिग्दर्शक जोड्यांपैकी एक आहे. या दोघांनी यापूर्वी अनेक मनोरंजक चित्रपट दिले आहेत. ज्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कॉमेडी, गंमत आणि कौटुंबिक मनोरंजनासाठी ओळखली जाणारी ही जोडी या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे.
श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्यासोबत राशी खन्ना एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. विजय राझ आणि सुदेश लाहिरी हे देखील या चित्रपटाचा भाग आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार आणि विद्या बालन ही जोडी मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र येत आहे. त्यांनी यापूर्वी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे आणि त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये आजही लोकप्रिय आहे.
या चित्रपटाची निर्मिती शिरीष रेड्डी आणि कुलदीप राठोड करत आहेत. केप ऑफ गुड फिल्म्स देखील या प्रकल्पाशी संबंधित आहे. हा श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्सचा 60 वा चित्रपट आहे. निर्माता दिल राजू पुन्हा एकदा एक असा चित्रपट घेऊन येत आहेत, ज्यात एक मोठा स्टार, एक दमदार दिग्दर्शक आणि मनोरंजनाचा एक परिपूर्ण पॅकेज आहे.
चित्रपटाचे काम ठरल्याप्रमाणे पुढे जात असून, २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होणाऱ्या सर्वात मोठ्या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटांपैकी हा एक असेल अशी अपेक्षा आहे. ज्या काळात मोठ्या पडद्यावर अॅक्शन आणि भव्यतेची चलती आहे, त्या काळात या चित्रपटामध्ये संपूर्ण कुटुंबाला पुन्हा चित्रपटगृहांकडे खेचून आणण्याची क्षमता आहे.
