‘दान नाही सेवा’ पूरग्रस्तांच्या मदतीवरील विधानानंतर अक्षय कुमारनं जिंकली प्रेक्षकांची मनं

Akshay Kumar चा वेगळा पैलू समोर आला आहे. मात्र याबाबत स्वत: अक्षय कुमारला कधीही सार्वजनिकरित्या सांगायला आवड नाही.

Akshay Kumar

Akshay Kumar

Akshay Kumar won hearts of audience afte statement on helping flood victims’Not Donation its service : टीव्ही शो व्हिल ऑफ फॉर्च्यून इंडियामध्ये एक भावूक क्षण पाहायला मिळाला. ज्यामध्ये वरिष्ठ पत्रकार सोनल कलरा यांनी अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या एका मोठ्या दानाची गोष्ट सांगितली. यामुळे अक्षयचा वेगळा पैलू समोर आला आहे. मात्र याबाबत स्वत: अक्षय कुमारला कधीही सार्वजनिकरित्या सांगायला आवड नाही.

मिनिमम बॅलन्सचा फटका! शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांच्या खात्यातून बँकांनी कापले हजारो कोटी

अक्षयच्या या दानाविषयी सांगताना सोनल कलरा यांनी सांगितलं की, अक्षय कुमारला ती 20 वर्षांपासून ओळखते. तिने अक्षय कुमारच्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा पैलू पाहिलेला आहे. ज्यामध्ये लॉकडाऊनमधील एक घटना सांगताना ती म्हटली की, देश जेव्हा कोरोना साथीमुळे त्रस्त होता तेव्हा आसाम आणि बिहारमध्ये पूर स्थिती आली होती. त्यावेळी मी ही घटना अक्षय कुमारला सांगितली होती. मी सांगितलं होतं की. लॉकडाऊनमुळे लोक त्रस्त आहेत त्याचबरोबर आसाम आणि बिहारमध्ये पूर आले आहेत. परिस्थिती कठीण आहे.

नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मुंबईतील मिठी नदीवर करा, पंतप्रधान मोदींवर संजय राऊतांची टीका

त्यावेळी अक्षय कुमारने मला म्हटलं की, तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयाचा नंबर मिळू शकतात का? त्यावेळी मी हा नंबर उपलब्ध करून दिला. त्यावेळी अक्षय कुमार यांनी काही तासांतच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्येकी एकेक कोटी रुपये दिले याची बातमी समोर आली होती. यावर सोनल यांनी थेट अक्षय कुमारला विचारणा केली असता. त्यांनी याचं श्रेय न घेण्याचं ठरवलं होतं. तसेच अक्षय कुमार म्हणाला होता की, मी हे पैसे दिले आहेत. मात्र याला दान म्हटलं जाऊ नये.

मोठी बातमी! दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला; एका भारतीयासह चार जण जखमी

हे सर्व गोष्ट सोनलने टीव्ही शो व्हिल ऑफ फॉर्च्यून इंडियामध्ये सांगितली. यावर अक्षय म्हणाला की, मला नेहमी वाटतं की, चॅरिटी आणि डोनेशन हे शब्द अत्यंत वाईट आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्याची मदत करता. तेव्हा ते तुमचं भाग्य असतं की तुम्ही ती मदत करू शकले. देवाने तुम्हाला एखाद्याची मदत करण्याचे लायक बनवलं. त्यामुळे मदतीला कधीही दान नाही. मात्र सेवा म्हटलं गेलं पाहिजे.

‘धुरंदर: द रिव्हेंज’चा इतर बॉलीवूड सिनेमांनी घेतला धसका… बऱ्याच सिनेमांचे रिलीज पुढे ढकलले

दरम्यान शोमध्ये झालेल्या या संवादानंतर प्रेक्षक आणि उपस्थित भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. तसेच मदत किती महत्त्वाची असते. मात्र अशा प्रकारे मदत केल्यानंतर कोणताही गाजावाजा न करता ही मदत केली गेली पाहिजे. अक्षय कुमारने याचं किती चांगलं उदाहरण लोकांसमोर ठेवलं आहे? अशाच चर्चा सध्या सुरू आहेत.

Exit mobile version