Alan Arkin Passed Away: प्रसिद्ध अभिनेते अन् ऑस्कर विजेते अ‍ॅलन अर्किन यांचे निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Alan Arkin : हॉलिवूड अभिनेते अॅलन अर्किन (Alan Arkin) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. (Alan Arkin Passed Away) अॅलन अर्किन हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.   Oscar-winning actor Alan Arkin passes […]

Alan Arkin

Alan Arkin

Alan Arkin : हॉलिवूड अभिनेते अॅलन अर्किन (Alan Arkin) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. (Alan Arkin Passed Away) अॅलन अर्किन हे एक उत्कृष्ट अभिनेते होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

 

कोण आहेत अॅलन अर्किन जाणून घ्या…

प्रसिद्ध अभिनेते अन् ऑस्कर विजेते अ‍ॅलन अर्किन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. ‘लिटिल मिस सनशाईन’, ‘द कमिंस्की मेथड’ अशा अनेक हॉलिवूड सिनेमांत ते महत्त्वाच्या भूमिकेत होते. नेटफ्लिक्सच्या काही वेबसीरिजमध्ये त्यांनी काम केलं होतं. मायकल डग्लसबरोबर ते एका वेबसीरिजमध्ये देखील झळकले होते. अॅलन अर्किन यांना अकादमीपुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि टोनी पुरस्कार अशा मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अॅलन यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. तरी त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

अॅलन अर्किनने १९५७ मध्ये ‘कोल्पो हीट वेव्ह’ या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तसेच ‘लिटिल मिस सनशाइन’ या हॉलिवूड सिनेमातील दर्जेदार अभिनयासाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २००६ मध्ये हा हॉलिवूड सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. त्यावेळी हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेमींच्या चांगलंच पसंतीस आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला कमावला होता.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

अॅलन अर्किन यांच्या निधनाने हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अॅलन यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आता त्यांच्या निधनाने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अॅलन अर्किन एक उत्कृष्ट अभिनेते आहेत. त्यांचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरले आहेत. तसेच त्यांच्या अनेक भूमिकाही गाजले आहेत.

Exit mobile version