Download App

Alka Yagnik: ‘या’ कारणासाठी आमिर खानला खोलीमधून बाहेर काढले, अलका याज्ञिकचा खुलासा

Alka Yagnik: १९८८ साली ‘कयामत से कयामत तक’ (Qayamat Se Qayamat Tak) सिनेमातून आमिर खानने (Aamir Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले. आमिरच्या या पहिल्या सिनेमाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, या चित्रपटाला ३५ वर्षे पूर्ण झाली आहेत.


गायिका अलका याज्ञिकने (Alka Yagnik) आमिर खानशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. अलका याज्ञिकने ‘कयामत से कयामत तक’ सिनेमासाठी अनेक गाणी (songs) गायली आहेत. त्यांनी गायलेली गाणी आजही चाहत्यांच्या ओठांवर आहेत. जेव्हा अलका याज्ञिक या सिनेमासाठी गाणे रेकॉर्ड करण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी सिनेमाचा मुख्य अभिनेता आमिर खानला खोलीतून बाहेर काढले होते. नंतर त्यांनी आमिर खानची माफी देखील मागितली होती.

यावर अलका म्हणाल्या की, मला आठवतं, मी ‘गजब का है दिन…’ गाणे रेकॉर्ड करत असताना आमिर खान माझ्यासमोरच येऊन बसला होता. तो तेव्हा नवीन होता, यामुळे मी त्याला ओळखत नव्हते. मला वाटले की तो एक चाहता असेल, म्हणून मी खूप प्रेमाने त्याला खोलीतून बाहेर जायला सांगितले होते. अलका याज्ञिक पुढे म्हणाल्या की, “गाणे रेकॉर्ड केल्यावर मन्सूर खानने माझी आमिर खानशी ओळख करून दिली आणि तो सिनेमाचा नायक असल्याचे सांगितले होते.

Wamiqa Gabbi : ‘या’ अभिनेत्रींचे चित्रपटसृष्टीबद्दल धक्कादायक खुलासा; म्हणाली, “महिलांचे ओठ आणि गाल…”

मला खूप लाज वाटली आणि लगेच मी त्याची माफी मागितली होती. आमिर हसला आणि म्हणाला, ‘काही हरकत नाही मॅडम.’ मला हा प्रसंग चांगलाच आठवतो. गेल्या काही वर्षात आमिर खानचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘लाल सिंग चढ्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. तर सोशल मीडियावर बॉलीवूडच्या बॉयकॉट ट्रेण्डनंतर आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा खूपच फ्लॉप ठरला. आता चाहत्यांना आमिर खानच्या पुढील म्हणजेच आगामी सिनेमाची प्रतीक्षा लागली आहे. मात्र आमिरने त्याच्या आगामी सिनेमाबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

Tags

follow us

वेब स्टोरीज