Pushpa 2 Bus Accident: ‘पुष्पा 2’ सिनेमाच्या बसचा झाला अपघात; दोन कलाकार जखमी

Pushpa 2: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत काही घटना घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पवन कल्याण (Pawan Kalyan) स्टारर ‘हरी हरा वीरा मल्लू’ या सिनेमाच्या सेटला आगी लागली होती. परंत्तू आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) सिनेमांची टीम ज्या बसमधून प्रवास करत होती, त्या बसचा भीषण अपघात झाला आहे.   View […]

Letsupp Image (4)

Pushpa 2 Bus Accident

Pushpa 2: गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सिनेमासृष्टीत काही घटना घडत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी पवन कल्याण (Pawan Kalyan) स्टारर ‘हरी हरा वीरा मल्लू’ या सिनेमाच्या सेटला आगी लागली होती. परंत्तू आता अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) सिनेमांची टीम ज्या बसमधून प्रवास करत होती, त्या बसचा भीषण अपघात झाला आहे.


तेलंगणाच्या (Telangana) नलगोंडा जिल्ह्यातील नरकेटपल्ली येथे हा भीषण अपघात झाला आहे. ‘पुष्पा-2’ सिनेमाच्या शूटिंगनंतर आंध्र प्रदेशातून हैदराबादला परतणाऱ्या कलाकारांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. नरकटपल्ली येथे ‘पुष्पा-2’सिनेमांच्या कलाकारांची बस एका आरटीसी बसला जोरदार धडकली आहे. या अपघातात जखमी झालेल्या कलाकारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

‘पुष्पा द राइज’ (Pushpa: The Rise – Part 1) हा सिनेमा 2021 मध्ये चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. पुष्पा द राइज या सिनेमातील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा या गाण्यांना चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे, आता या सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रुल हा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.


‘पुष्पा द रुल’ सिनेमाचा एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपूर्वी टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देत असल्याचे दिसून आले आहे. तो म्हणतो, ‘तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.’ तर दुसरी न्युज अँकर म्हणते, ‘पुष्पाला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या’ आता तुरुंगातून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटी समजले आहे.

Gutami Patil ला तेव्हा दोन वेळचं जेवण द्यायला कुणी गेलं नव्हतं; विरोध करणाऱ्यांचा अमोल कोल्हेंकडून समाचार

पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये गेला आहे. ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुनसोबतच अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील प्रमुख भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 सिनेमामधील रश्मिकाच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. पुष्पा सिनेमाच्या पहिल्या भागामध्ये अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

Exit mobile version