Download App

Allu Arjun Press : झुकेगा नहीं साला! संध्या थिएटर चेंगराचेंगरीत माझा संबंध नाही पण…

  • Written By: Last Updated:

Allu Arjun Press Conference : पुष्पा 2 अभिनेता अल्लू अर्जुनची आज (दि. 14) सकाळी अखेर तुरुंगातून जामीनावर सुटका झाली आहे. तुरुंगातून बाहेर येताच अल्लू प्रथम गीता आर्ट्स प्रॉडक्शन हाऊसमध्ये पोहोचला, त्यानंतर त्याने मीडियाशी संवाद साधला. यात त्याने संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरी घटनेत आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे.

जामीन मिळाल्यानंतरही रात्रभर अल्लू अर्जुनचा तुरुंगातच मुक्काम; नेमकं काय घडलं?

नेमकं काय म्हणाला अल्लू अर्जुन?

तुरूंगातून जामीनावर बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने (Allu Arjun) पत्रकार परिषदेत त्याची घडलेल्या घटनेबाबत सविस्तर भाष्य केले. तो म्हणाला की, संध्या थिएटर बाहेर घडलेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. या घटनेबद्दल मी याआधीच दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगत लवकरच मृत महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले. मी कायद्याचा आदर करतो आणि या प्रकरणात कायद्याला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचेही यावेळी अल्लू अर्जुनने सांगितले.

‘अपघाताचा माझा थेट संबंध नाही’

अल्लू अर्जुन म्हणाला की, ‘घडलेल्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबासाठी खूप दुःखी आहे. पण, ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळी मी माझ्या कुटुंबासह चित्रपटगृहात चित्रपट पाहत होतो आणि बाहेर अपघात झाला. त्यामुळे घडलेल्या घटनेत माझा थेट संबंध नाही. घटलेली घटना चुकून आणि अनावधानाने घडली असून, मी गेल्या 20 वर्षांपासून एकाच थिएटरमध्ये जात असून मी 30 पेक्षा जास्त वेळा या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे, पण अशी घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती.

राहा तयार! डार्क, डेडली आणि ब्रूटल… ; मर्दानी 3 ची घोषणा

संध्या थिएटरमध्ये नेमकं काय घडलं होतं?

4 डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 (Pushpa 2) चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अल्लू अर्जुनही स्क्रिनिंगला पोहोचला होता. त्यावेळी अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली आणि त्याचे रूपांतर चेंगराचेंगरी झाले. ज्यात एका महिलेचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर याप्रकरणी अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 13 डिसेंबर रोजी हैदराबाद पोलिसांनी या प्रकरणी अभिनेत्याला अटक केली होती.

4 आठवड्यांच्या अंतरिम जामिनावर अभिनेत्याची सुटका

अटकेनंतर अल्लू अर्जुनला नामपल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते, जिथे न्यायालयाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची कोठडी सुनावली. त्यानंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने अभिनेत्याला 4 आठवड्यांचा जामीन दिला आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे जामीन आदेश पोलीस ठाण्यात पोहोचू शकला नाही त्यामुळे सुपरस्टार अल्लू अर्जुनला एकरात्र तुरुंगात काढावी लागली.

follow us