Download App

Pushpa 2 OTT: प्रदर्शनाच्या आधीच तब्बल इतक्या कोटींना विकले गेले ‘Pushpa 2’चे OTT हक्क

Pushpa 2 OTT Streaming Rights: 'पुष्पा - द राइज' च्या (Pushpa) जबरदस्त यशानंतर, प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रतीक्षा करत आहेत.

Pushpa 2 OTT Streaming Rights: ‘पुष्पा – द राइज’ च्या (Pushpa) जबरदस्त यशानंतर, प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची प्रतीक्षा करत आहेत. अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘पुष्पा 2’ यावर्षी (Pushpa 2 ) पडद्यावर येणार आहे. ‘पुष्पा 2’ यावर्षी 6 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु चित्रपटाचे ओटीटी (OTT ) हक्क त्याच्या प्रदर्शनापूर्वी अनेक महिने विकले गेले आहेत आणि ‘पुष्पा 2’ ने या कराराद्वारे आपल्या बजेटपैकी निम्मे पैसे काढले आहेत. ‘पुष्पा 2’ चे ओटीटी अधिकार डिजिटल प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) खरेदी केले आहेत. चित्रपटाचे निर्माते आणि नेटफ्लिक्समध्ये करोडोंचा करार झाला आहे. आकाशवाणीच्या मते, अल्लू अर्जुन अभिनीत या बहुप्रतिक्षित सिक्वेल चित्रपटासाठी नेटफ्लिक्सने निर्मात्यांना 270 कोटी रुपये दिले आहेत. अशाप्रकारे ‘पुष्पा 2’ डिजिटल अधिकारांच्या बाबतीत सर्वात महागड्या भारतीय चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.


चित्रपटाचे अर्धे बजेट होते

‘पुष्पा 2’ ने 270 कोटी रुपयांना ओटीटी अधिकार विकून अर्ध्याहून अधिक बजेट काढून घेतले आहे. वास्तविक, अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट जवळपास 500 कोटी रुपये आहे.

ओटीटीवर विकला जाणारा चौथा सर्वात महागडा चित्रपट ठरला

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ ओटीटी वर विकला जाणारा चौथा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. याआधी ‘KGF Chapter- 2’ तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याचे हक्क प्राइम व्हिडिओने 320 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रभासचा चित्रपट दोन OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स (175 कोटी) आणि प्राइम व्हिडिओ (200 कोटी) यांनी 375 कोटी रुपयांना संयुक्तपणे विकत घेतला. पहिल्या स्थानावर ‘RRR’ आहे ज्याचे हक्क नेटफ्लिक्स, Zee5 आणि हॉटस्टारने 385 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

Pushpa 2 Movie : ‘पुष्पा 2’ची फायनल तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार रिलीज? वाचा एका क्लिकवर

‘पुष्पा 2’ ची दोन गाणी रिलीज

सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ याआधी 15 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, नंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. या चित्रपटाचे शीर्षक गीत आणि ‘अंगारो’ रिलीज झाले आहे, जे प्रेक्षकांना खूप आवडले आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

follow us