Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’सिनेमाला ब्रेक, काय आहे नेमकं कारण?

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’सिनेमाला ब्रेक, काय आहे नेमकं कारण?

Pushpa 2 Release Date: अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) चित्रपट ‘पुष्पा 2’ (Pushpa 2 Movie) हा टॉलीवूडचा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर संपूर्ण देशात या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. (Pushpa 2 Release Date) या चित्रपटाची दोन गाणी यापूर्वीच रिलीज झाली आहेत. निर्मात्यांनी सुरुवातीला तो 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. त्यानंतर माहिती आली की 6 डिसेंबर पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. पण आता येणारी माहिती ‘पुष्पा 2’ची वाट पाहणाऱ्यांना चाहत्यांना नक्कीच मोठा धक्का असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की पुन्हा एकदा ‘पुष्पा 2’ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येणार आहे. शूटिंगच्या अनियमित शेड्युलला कंटाळून अल्लू अर्जुनने दाढी कापली असल्याचे बोलले जात आहे. अल्लू अर्जुनची दाढी हा चित्रपटातील त्याच्या लूकचा महत्त्वाचा भाग आहे. यानंतर ते कुटुंबासह युरोपलाही गेले, अशीही माहिती समोर आली आहे. पुष्पाचे दिग्दर्शक ते देखील अमेरिकेला गेले आहेत, त्यामुळे चित्रपटाला आणखी थोडा उशिरा रिलीज होणार आहे.

नेमकं कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार असेही म्हटले आहे की, अल्लू अर्जुनने केवळ चित्रपटासाठी दाढी केली आहे आणि ज्या काही अफवा उडत आहेत त्या सर्व पूर्णपणे चुकीच्या आहेत. मात्र, कारण काहीही असो, ‘पुष्पा 2’ रिलीज पुढच्या वर्षी पुढे ढकलण्यात आल्याचं नक्कीच बोललं जात आहे. आता या गोष्टींमध्ये कितपत तथ्य आहे याची अचूक माहिती फक्त ‘पुष्पा 2’ चे निर्मातेच देऊ शकतात.

पुष्पा पुष्पा ‘द कपल सॉन्ग’ Pushpa 2 : The Rule मधील दोन्ही गाण्यांची नेटकऱ्यांना भूरळ!

सुकुमारच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘पुष्पा 2’ मध्ये अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय अनुसया भारद्वाज, राव रमेश आणि जगदीश हे कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्स करत आहे. यातील संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube