Allu Arjun Birthday : 100 कोटींचा बंगला, महागड्या गाड्या असं आहे ‘पुष्पाचं’ लॅविश लाईफ!

Allu Arjun Birthday : 100 कोटींचा बंगला, महागड्या गाड्या असं आहे ‘पुष्पाचं’ लॅविश लाईफ!

Allu Arjun Birthday :श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांनी ‘पुष्पा : द राईज’ या चित्रपटाने चाहत्यांना भूरळ घातली. याचं चित्रपटाचा दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुननचा आज वाढदिवस आहे. तर आता पुन्हा एकदा अल्लू अर्जुन चर्चेत आला आहे. कारण आता अक्षरशः धुमाकुळ घालणाऱ्या पुष्पा चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

साऊथच्या इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या स्टार्समध्ये अल्लू अर्जुनचं नाव पहिले घेतलं जात. अल्लू अर्जुनने लहान वयातच अभिनयाला सुरूवात केली होती. आता तो साऊथचा सुपरस्टार झाला आहे. तसेच नेहमीच चर्चेत असणाऱ्या अल्लू अर्जुनकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. त्याची संपत्ती ऐकुण तुम्ही चकीत झाल्या शिवाय राहणार नाही. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ 100 कोटींचा बंगला, महागड्या गाड्या कसं आहे ‘पुष्पाचं’ लॅविश लाईफ?

अल्लू अर्जुनची एकुण नेट वर्थ 380 कोटींहून अधिक आहे. अल्लू त्याच्या चित्रपटांतून मोठी कमाई करतो. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार तो प्रत्येक चित्रपटासाठी 12 ते 15 कोटी रुपये चार्ज करतो. त्याशिवाय तो ब्रॅंड प्रमोशनमधूनही पैसे कमावतो. असं देखील सांगण्यात येत की, तो प्रत्येक जाहिरातीसाठी एक कोटीहून अधिक मानधन घेतो.

अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डी आणि दोन मुलांसह हैदराबादमध्ये एका लॅविश बंगल्याच राहतो. त्याचं हे ड्रीम होम इतकं लग्झरीअस आहे की, हा बंगला तब्बल दोन एकरमध्ये आहे. यामध्ये जिम, लॉन, स्विमिंग पुल आणि थिएटरसह सगळं काही आहे. तर या बंगल्याची किंमत ऐकुण तुम्ही थक्क व्हाल कारण या बंगल्याची किंमत तब्बल 100 कोटी आहे.

Shreyas Talpade: ‘अब रुल पुष्पा का…’, ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट

यासह अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन देकील तेवढीच आलिशान आहे. फल्कान असं त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचं नाव आहे. रेड्डी कस्टम्सने ती मॉडिफाई केली आहे. यामध्ये लग्जरी केबिनपासून लेकर मास्टकर केबिन असं सगळं काही आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमतही कोट्यावधी म्हणजे तब्बल 7 कोटी आहे.

बंगला आणि गाडीच नाही तर अल्लू अर्जुनकडे महागड्या आणि अलिशान गाड्या देखील आहेत त्याच्या कार्सच्या कलेक्शनमध्ये रेंज रोवरपासून ऑडी आणि बीएमडब्ल्यू एक्स6 कूपही आहे. कोट्यावधींची जग्वार आणि पोर्शे यासांरख्या गाड्याही त्याच्या या ताफ्यात आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube