पंढरपूर तालुक्यातील सुस्ते गावात यात्रेनिमित्त (Dance) आयोजित करण्यात आलेल्या नृत्य कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात दोन तरुणांमधील किरकोळ वाद हाणामारीत परिवर्तित झाला. कार्यक्रमाच्या अखेरीस दोन तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुस्ते गावात यात्रेच्या पार्श्वभूमीवर राधा पाटील हिचा भव्य नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम सुरळीत सुरू असताना मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. मात्र, सुरुवातीला शब्दांत सुरू झालेला वाद काही वेळातच तीव्र झाला आणि त्याचे रूपांतर मारामारीत झाले. वाद वाढत गेल्याने संबंधित तरुणांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. काही जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राची मोरनी गौतमी पाटील तिच्या नव्या लूक बद्दल काय म्हणाली
या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तणावपूर्ण वातावरण पाहता आयोजकांनी कार्यक्रम तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी गर्दी बाजूला सारत परिस्थिती शांत केली असून पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
गौतमी पाटील आणि राधा पाटील यांचे शो असले की तिथे प्रेक्षकांची भरपूर गर्दी होते. लोक अगदी जागा मिळेल तिथे उभे राहतात. काहीजण अक्षरशः झाडावर चढून सुद्धा डान्स पाहत असतात. राधा पाटील च्या याच पंढरपुरातील कार्यक्रमात काही तरुणांमध्ये अचानक हुल्लडबाजी सुरू झाली. किरकोळ वादातून तरुण एकमेकांना मारू लागले. मात्र हा वाद हळूहळू गंभीर रोप धारण करू लागला. हे प्रकरण इतके टोकाला पोहोचले की राधा पाटील ला स्वतःचा डान्सचा शो मध्येच थांबवून स्टेजवरून काढता पाय घ्यावा लागला.
