Download App

“अमायरा” चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड

Amaira हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून, त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Amaira movie gets overwhelming response from audience! A successful run at the box office in the first week : नुकताच प्रदर्शित झालेला मुक्ता आर्टस् निर्मित आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अमायरा” हा मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या मनाला भिडला असून, त्याला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 23 मे 2025 रोजी हा सिनेमा रिलीझ झाला. उत्कृष्ट अभिनय आणि दर्जेदार कहाणी यामुळे “अमायरा” ने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड केली आहे.

ठाकरे सेनेला धक्का! पुण्यात शिंदेंची दमदार वाटचाल; सुषमा अंधारेंच्या निकटवर्तीयाची संघटकपदी वर्णी

काही सिनेप्रेमी प्रतिक्रिया देत म्हणाले, “अमायरा” ही फक्त कथा नसून, ती एक भावना आहे. सिनेमा पाहून मनापासून समाधान वाटलं” तर “अमायरा” चे यश हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक सकारात्मक पाऊल आहे. असा एका चं म्हणणं होतं. चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेल्या अजिंक्य देव, राजेश्वरी सचदेव, पूजा सावंत, सई गोडबोले यांच्या अभिनयाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. खासकरून सर्वात यंग अभिनेत्री म्हणजेच सई गोडबोले ला प्रेक्षक भरपूर प्रेम देत आहेत.

पहिले शारीरिक, मानसिक छळाचे आरोप अन् आता फुलस्टॉप; सिद्धांत शिरसाट प्रकरणात ट्विस्ट

“या चित्रपटात नव्या चेहऱ्याने साकारलेली मुख्य भूमिका तितकीच ताकदवान आहे, सईच्या नैसर्गिक अभिनयाने भारावून टाकले आहे. संगीत सुद्धा चित्रपटाचे वैशिष्ट्य असून, प्रत्येक गाणं कथानकात सहज मिसळत जाते. विशेष म्हणजे, चित्रपटात एक अप्रतिक्षित वळण येतं जे आश्चर्यचकित करतं. असं मत एकाने व्यक्त केलं.

पहिल्याच पावसात भाजप, शिंदे अन् अजित पवारांच्या भ्रष्टाचाराची त्सुनामी मंत्रालयात,चौकशी कधी? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

संगीत, छायाचित्रण आणि पार्श्वसंगीत यांनाही विशेष दाद मिळत आहे. सिनेमा पाहिल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटाचे अनेक भावस्पर्शी प्रसंग शेअर करत “अमायरा” विषयी आपले प्रेम व्यक्त केले आहे. “अमायरा” हा चित्रपट प्रेम, संघर्ष आणि आत्मभानाच्या प्रवासाची कथा सांगतो. आजच्या तरुणाईला भावणारा असा हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.

1 ऑगस्टपासून UPI वर बॅलन्स चेकींग अन्ऑटो पेवर लिमिट! दिवसातून किती संधी मिळणार? जाणून घ्या…

चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे लोकेश गुप्ते ह्यांनी, तर मुक्ता आर्टस् ने निर्मिती केली आहे. ए व्ही के एंटरटेनमेंट आणि महलसा एंटरटेनमेंट च्या अंतर्गत हा सिनेमा बनला आहे. “अमायरा” या सिनेमाचे लेखक मिहीर राजदा आहेत. तसेच राहुल पुरी, स्वाती खोपकर, सुरेश गोविंदराय पै निर्माते आहेत. तसेच सह निर्माते निनाद नंदकुमार बत्तीन आणि तबरेज पटेल हे आहेत. “अमायरा” हा सिनेमा २३ मे २०२५ पासून सर्वत्र प्रदर्शित.

follow us