1 ऑगस्टपासून UPI वर बॅलन्स चेकींग अन्ऑटो पेवर लिमिट! दिवसातून किती संधी मिळणार? जाणून घ्या…

Limit on balance checking on UPI from 1 August 2025 : यूपीआय ही सर्विस आल्यापासून ज्याप्रमाणे आर्थिक व्यवहार एका क्लिकवर करणे शक्य झाले आहे.त्याचप्रमाणे आपल्या खात्यावरील बँक बॅलन्स तपासणे हे देखील तेवढेच सोपं झालं आहे.मात्र जे ग्राहक वारंवार यूपीआयद्वारे आपला बँक बॅलन्स चेक करत असतात.त्यावर आता लिमिट येणार आहे. त्याचबरोबर ऑटो पे या सिस्टीममध्ये देखील मोठा बदल होणार आहे.हे नियम एक ऑगस्ट 2025 पासून लागू करण्यात येणार आहे.
यूपीआय बॅलन्स चेकवर लिमिट काय?
एक ऑगस्ट 2025 पासून यूपीआय युजर्स दिवसभरात केवळ 50 वेळाच यूपीआयवरून त्यांचा बँक बॅलन्स चेक करू शकतील. हे लिमिट एकाच यूपीआय अँपसाठी असेल दुसरं यूपीआय अँप तुम्ही वापरत असाल तर त्यावर वेगळ्या पन्नास वेळा बॅलन्स तपासला जाऊ शकतो. मात्र यापेक्षा अधिक वेळा तुम्हाला तुमचा बँक बॅलन्स जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेचे अँप वापरावं लागेल.
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर मराठा समाज आक्रमक, ‘हुंडा’ घेणाऱ्यांना शिकवणार धडा; समिती होणार स्थापन
त्याचबरोबर अनेकदा ग्राहकांकडून ऑटो पे ही सिस्टीम लावली जाते. त्यामध्ये विविध प्रकारचे ईएमआय पे करण्यासाठी याचा वापर केला जातो.ज्याद्वारे ऑटोमॅटिकली ईएमआय भरले जातात. मात्र आता हे पेमेंट पीक अवर्स म्हणजे सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत त्याचबरोबर सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये ऑटो पेमेंट होऊ शकणार नाही.त्यामुळे ईएमआय भरायला उशीर लागू शकतो.
यूपीआय वर जास्तीत जास्त बँक अकाउंट लिंक करण्यावर देखील लिमिट येणार आहे. जास्तीत जास्त बँक अकाउंट एका मोबाईल नंबर वरून यूपीआयला कनेक्ट असल्यास बँक बॅलन्स चेक करण्याला 25 संधी असते.
निलंबित PSI रणजित कासलेंचा दुसरा व्हिडिओ; थेट मंत्र्याचं नाव अन् फोटो दाखवत गंभीर आरोप
त्याचबरोबर यूपीआयवरून व्यवहार करताना जर पेमेंट प्रोसेसिंगमध्ये पडलं तर ते वारंवार चेक करता येणार नाही.असे केल्यास एपीआय कॉल्स बंद होतील आणि ग्राहकांना तात्काळ पेमेंट यशस्वी झाला आहे की नाही हे कळणार नाही. दरम्यान हे सर्व नियम 1ऑगस्ट 2025 पासून लागू केले जाणार आहेत.
याबाबत एनपीसीआयने बँका आणि पी एस पी एस ला आदेश दिले आहेत.