Amar Singh Chamkila New Song Out : दिलजीत दोसांझ ( Diljit Dosanjh ) आणि परिणीती चोप्राचा (Parineeti Chopra) बहुप्रतिक्षित चित्रपट ‘अमर सिंह चमकीला’चं ( Amar Singh Chamkila ) नवं गाणं रिलीज झालं आहे. या चित्रपटामध्ये दिलजीत पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार अमर सिंह चमकिला यांच्या भूमिकेत दिसत आहे.
‘तु क्या जाने’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या चालीने प्रेक्षकांना खेळवून ठेवलं आहे. या गाण्याचं संगीत म्हटलं तर पारंपारिक बिट्स मात्र मॉडर्न गाण्यांप्रमाणे हे गाणं आहे. याशिका सिक्का यांनी हे गाणं लिहिला आहे. तर त्याचे संगीत उस्ताद ए आर रहमान यांनी दिले आहे आणि गीत इर्शाद कामिल यांनी लिहीले आहे.
Beed Loksabha : शरद पवारांच्या यादीत ज्योती मेटेंचं नाव? कन्फ्यूजन क्लिअर
अमर सिंह हे चमकिला पंजाबी (Punjabi) इंडस्ट्रीतील खूप मोठे नाव होते. एक काळ असा होता की त्यांचे नाव इंडस्ट्रीत प्रसिद्ध होते. ते पंजाबचे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार होते. पंजाबच्या या सुपरस्टारची दर्दभरी कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सला टक्कर देणार आहे. या नेटफ्लिक्स चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले आहे, हा सिनेमा 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.
ठाकरेंचा शिलेदार आंबेडकरांच्या गळाला, वसंत मोरे 5 एप्रिलला ‘वंचित’मध्ये करणार प्रवेश
चमकीला पंजाबची सुपरस्टार होती: अमर सिंह हे चमकीला पंजाबच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करायचे. त्यांचे संगीत पंजाबमधील लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते. त्याच्या स्टारडममुळे इंडस्ट्रीतील मोठे कलाकार घाबरायचे. ‘पहेले ललकरे नाल’, ‘बाबा तेरा ननकाना’ अशी अनेक प्रसिद्ध गाणी त्यांनी संगीतबद्ध केली आहेत. चाहते आजही ही गाणी मोठ्या उत्सुकतेने ऐकतात.
कारमध्ये हल्ला: एक दिवस येईपर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते. काही लोकांनी अमरसिंह चमकिला यांची गोळ्या झाडून हत्या केली. ही गोष्ट आहे 1988 सालची जेव्हा अमर सिंह त्यांची पत्नी अमरजोतसोबत स्टेज परफॉर्मन्ससाठी जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या काही लोकांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या अपघातात त्यांच्या पत्नीलाही आपला जीव गमवावा लागला. काही वर्षे उलटली तरी हल्लेखोर सापडलेले नाहीत. मात्र, यामागे शीख दहशतवाद्यांचा हात असल्याचे पंजाबमधील काही लोकांचे म्हणणे आहे.