ठाकरेंचा शिलेदार आंबेडकरांच्या गळाला, वसंत मोरे 5 एप्रिलला ‘वंचित’मध्ये करणार प्रवेश

  • Written By: Last Updated:
ठाकरेंचा शिलेदार आंबेडकरांच्या गळाला, वसंत मोरे 5 एप्रिलला ‘वंचित’मध्ये करणार प्रवेश

Vasant More Will Join VBA : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी देत ‘एकला चलो’चा नारा दिला होता. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर काल वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून वसंत मोरे यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले. दरम्यान, आता वसंत मोरे हे पाच एप्रिल रोजी वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत.

Kangana Ranaut: रणदीप हुड्डाने पुन्हा आलियाला सपोर्ट केला, तर ‘या’ अभिनेत्रीला थेट सुनावलं; म्हणाला… 

पुण्यातून मोरेंनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, कॉंग्रेसने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली. त्यामुळं चार दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन लोकसभेच्या उमेदवारीवर चर्चा केली होती. त्यानंतर काल वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर झाली. या यादीत वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी घोषित केली. आता 5 एप्रिल रोजी वसंत मोरे अधिकृतपणे वंचित बहुजन आघाडी पक्षात सामील होणार आहेत. प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्षात प्रवेश करणार आहेत.

सोनाक्षी सिन्हाने जॅमसोबत पार्टीत दाखवली जबरदस्त स्टाइल; ‘हिरामंडी’चे दुसरे गाणं रिलीज

वसंत मोरेंचा पक्ष प्रवेश प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील निवासस्थानी होणार आहे. शक्तीप्रदर्शन करत मोरेंचा पक्ष प्रवेश सोहळा अकोल्यात पार पडणार आहे.

दरम्यान, वसंत मोरे यांनी आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली आहे. वसंत मोरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभेची निवडणूक आपण कोणाची मते खाण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी लढत आहोत. किमान पन्नास हजार मतांनी आपण विजयी होऊ, असा दावा वसंत मोरे यांनी केला आहे.

वंचितने वसंत मोरे यांना लोकसभेचे उमेदवारी दिल्यानतर पुण्यात तिरंगी लढत होणार आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. यांच्या उमेदवारी विषयी बोलतांना मोरेंनी म्हटलं की, भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे दोघेही आपले मित्र आहे. मात्र पुण्यातून शंभर टक्के आपणच जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज