Amazon MGM Studios announces new film ‘Raftaar’ : शिक्षण क्षेत्रातील तीव्र स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आधारित रफ्तार हि महत्वाकांक्षा, प्रेम आणि लोभाची रोचक कथा आहे. आदित्य निंबाळकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती पत्रलेखा यांनी कांपा फिल्मच्या बॅनरखाली केली आहे. ॲमेझॉन MGM Studios ने आज जाहीर केले की त्यांचा ‘रफ्तार’ हा चित्रपट 24 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
आदित्य निंबाळकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती पत्रलेखा यांनी ‘कांपा फिल्म’च्या बॅनरखाली केली आहे. या चित्रपटाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर Tarun Bali आहेत, तर कथा आणि पटकथा रोहन नरूला यांनी लिहिली आहे. चित्रपटात राजकुमार राव आणि कीर्ति सुरेश मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत अनुराग ठाकूर , रोहन वर्मा, तान्या मानिकतला आणि रजत कपूर यांसारखे प्रतिभावान कलाकारही यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
सोनम वांगचुक यांची नजरकैदेतून सुटका, NSA चा खटलाही रद्द; लडाख हिंसाचारावर केंद्राचा मोठा निर्णय
‘रफ्तार’ची कथा अशा जगावर आधारित आहे, जिथे मोठी स्वप्ने साम्राज्य उभी करतात आणि यश मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. एका वेगाने पुढे जाणाऱ्या स्टार्टअपभोवती आणि एका जिद्दी पुरुष व तितक्याच महत्त्वाकांक्षी महिलेतील चढ-उतारांनी भरलेल्या नात्याभोवती ही कथा फिरते. पैसा, सत्ता आणि लोभ वाढत जात असताना जिंकण्याची त्यांची भूक प्रेमाच्या आड येऊ लागते. यशाचा हा प्रवास जितका रोमांचक आहे, तितकाच पडझडीनंतरचा प्रश्नही सरळ आहे. ते पुन्हा लढून शिखरावर पोहोचतील का, की इथेच त्यांचा प्रवास संपणार? ॲमेझॉन MGM Studios ची ‘रफ्तार’ 24 जुलै 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
