अस्सल मसाला मनोरंजक कलाकृती, अनुराग कश्यपच्या निशानचीचा ट्रेलर प्रदर्शित

अस्सल मसाला मनोरंजक कलाकृती, अनुराग कश्यपच्या निशानचीचा ट्रेलर प्रदर्शित

Amazon MGM Studios India released exciting trailer of film ‘Nishanchi’ : अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडियाच्या वतीने आज त्यांच्या आगामी, सिनेमागृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘निशानची’ या सिनेमाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित केला. अनुराग कश्यप दिग्दर्शित, हा सर्वोत्कृष्ट देशी मसाला मनोरंजनपट खऱ्या अर्थाने मोठ्या पडद्यावरील भव्य प्रदर्शनाचे आश्वासन देतो. सिनेप्रेमींना आवडणारे प्रत्येक घटक म्हणजे अॅक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी, मां का प्यार आणि फिल्मी समावेश असलेला तगडा ट्रेलर आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’ चा काव्यमय टिझर प्रदर्शित! चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

नवोदित ऐश्वर्य ठाकरेच्या तडफदार दुहेरी भूमिकेसह, ‘निशानची’चे कथानक जुडवा भाई बबलू आणि डबलू यांच्या खिळवून ठेवणारे जीवन उलगडते- या व्यक्ति रेखांच्या आस्थेच्या अगदी विरुद्ध असलेली प्रतिबिंब. या सिनेमाची निर्मिती अजय राय आणि रंजन सिंह यांनी जार पिक्चर्स अंतर्गत, फ्लिप फिल्म्सच्या सहकार्याने केली असून प्रसून मिश्रा, रंजन चंदेल, तसेच अनुराग कश्यप यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. वेदिका पिंटो, मोनिका पंवार, मोहम्मद जीशान अय्यूब, त्याचप्रमाणे कुमुद मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘निशानची’ हा सिनेमा १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’ चा काव्यमय टिझर प्रदर्शित! चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

‘निशानची’चा ट्रेलर प्रेक्षकांना २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, थेट उत्तर प्रदेशातील छोट्या शहरातील गजबजलेल्या गल्लीत घेऊन जातो. जिथे बबलू निशानची, रंगीली रिंकू आणि डबलू यांचे जीवन अनपेक्षित मार्गांनी धडकते. थक्क करणारा पाठलाग, शिट्टी-मार संवाद, मातीतला देशी संघर्ष आणि हळुवार प्रेमाच्या कोमल क्षणांसह, हे चुंबकीय कथानक जितके अस्ताव्यस्त आहे तितकेच अस्ताव्यस्त जग रंगवते. हसवणारा धमाल विनोद आणि ‘अनफिल्टर्ड देसी स्वॅग’सह हा ट्रेलर बंडखोरी, प्रणय आणि शत्रुत्वाची नाडी समान प्रमाणात हेरतो. थिरकायला लावणाऱ्या तालांनी आणि लार्जर देन लाईफ कथा प्रेक्षकांना त्यांच्या आसनावर खिळवून ठेवते. एक स्फोटक कथा पुढे सरकत जाते; जी उलगडण्याची वाट प्रेक्षक पाहत राहतील.

अतिशहाणपणा नको, इतरांच्या आरक्षणात लुडबूड कशाला? विखेंकडून हाकेंसह जीआरला विरोध करणाऱ्यांचा समाचार

‘निशानची’चे दिग्दर्शक आणि सहलेखक अनुराग कश्यप म्हणाले की , “अमेझॉन एमजीएम स्टुडिओज इंडिया’ सोबत काम करणे अत्यंत फलदायी ठरले. कारण त्यांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला. ऐश्वर्य, वेदिका, मोनिका, झिशान, कुमुद आणि या सिनेमातील प्रत्येक कलाकाराने केवळ अभिनयच केला नाही, तर या पात्रांसोबत जगले आणि श्वास घेतला. कथेप्रती त्यांची बांधिलकी आणि अभिनयाची सत्यता या कलाकृतीत चमकते. माझ्या टीमने त्या उत्कटतेची जुळवाजुळव फ्रेम-टू-फ्रेम केली आहे. ज्यामुळे सिनेमा इतका चांगला बनला. शिवाय त्याच्या संगीतातदेखील तीच भावना सिनेमातून वाहते आणि कथेत भर घालते. प्रेक्षकांना हे संगीत खरोखरच आवडेल मला याची खात्री वाटते.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube