‘आंबट शौकीन’चं पोस्टर प्रदर्शित! कलाकारांची फौज करणार प्रेक्षकांचे मनोरंजन डबल

Ambat Shaukeen Film Poster Released : हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे ( Ambat Shaukeen) पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले (Marathi Movie) आहे. तर या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे व किरण गायकवाड या […]

_Ambat Shaukeen Film Poster Released

_Ambat Shaukeen Film Poster Released

Ambat Shaukeen Film Poster Released : हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे ( Ambat Shaukeen) पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले (Marathi Movie) आहे. तर या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे व किरण गायकवाड या तीन मित्रांची (Entertainment News) अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे.

HSC result 2025: बारावीचा निकाल, विभागनिहाय निकालात कोण आघाडीवर? वाचा एका क्लिकवर…

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तिची काय भूमिका असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या चौघांसोबत या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, ( Ambat Shaukeen Film Poster Released) पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, ‘आंबट शौकीन’ ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या तीन मित्रांची गंमतीशीर सफर या सिनेमातून दाखवली आहे. हा चित्रपट हास्य, विनोदने प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. तसेच चित्रपटाला लाभलेल्या उत्तम कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

अभिजीतच्या आवाजाची जादू कायम! ‘चाल तुरु तुरु’… यूट्यूबवर ट्रेंड होतंय

चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे अन् अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या 13 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

 

Exit mobile version