अभिजीतच्या आवाजाची जादू कायम! ‘चाल तुरु तुरु’… यूट्यूबवर ट्रेंड होतंय

अभिजीतच्या आवाजाची जादू कायम! ‘चाल तुरु तुरु’… यूट्यूबवर ट्रेंड होतंय

Abhijeet Sawant Song Chal Turu Turu Trending on YouTube : बिग बॉसनंतर अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) नुकतंच प्रेक्षकांना एका गोड आणि जुन्या गाण्याचा नव्या ट्विस्टने मंत्रमुग्ध केलंय. अभिजीतचा सदाबहार आवाज आणि त्याचा जादूई आवाजाची प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पडली (Entertainment News) आहे. याला कारण देखील तितकच (Marathi Song) खास आहे. ‘चाल तुरु तुरु’ या जुन्या गाण्याला अभिजीतने (Abhijeet Sawant Song) एक नवा स्पिन ट्विस्ट देत हे गाणं ट्रेंडमध्ये आणलं आहे. जुन्या गाण्याची मज्जा काही औरच असते आणि अश्यातच प्रेक्षकांना हे गाणं एवढं आवडलं की, हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.

या गाण्यानं अभिजीतच्या आवाजाची जादू कायम आहे हे दाखवून दिलं, (Chal Turu Turu Trending on YouTube) पण सध्या हे गाणं यूट्यूब वर ३ नंबर वर ट्रेंड होताना दिसतंय. एवढंच नाही तर या गाण्यानं 5.7 लाख व्ह्यूज सुद्धा मिळवले आहेत. गाण्याचे बोल जुने असले तरी आजच्या तरुणाईला या जुन्या गाण्याची भुरळ पडली, असं म्हणायला हरकत नाही.

Video : पहलगामच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्याची आत्महत्या; व्हिडिओ होतोय व्हायरल

इंडियन आयडॉलपासून अभिजीतच्या सांगतिक प्रवासाला सुरुवात झाली. आज हा संगीत विश्वातला त्याचा प्रवास 20 वर्ष पूर्ण करत असताना पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यानं मोहित केलं आहे. बिग बॉसनंतर प्रेक्षकांना अभिजीत काय नवीन करणार, याची उत्सुकता होती. आता हे गाणं पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या पसंतीस पडतंय.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, आठवड्याचा पहिला दिवस काय सांगतो, वाचा भाकित

‘चाल तुरु तुरु’ सारख्या जुन्या गाण्याला नवा स्पिन ट्विस्ट देणं, देखील तितकच आव्हानात्मक होतं. पण, प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा दृष्टीने हे गाणं अभिजीतने केलं. आता प्रेक्षक त्याला भरभरून प्रेम देतात. एकंदरीत काय अभिजीतने आजवर त्यांचा प्रेक्षकांना नवनवीन गाण्याची मेजवानी तर दिली, पण आता तो पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसतोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube