Bigg Boss Marathi 5 Winner : मोठी बातमी, सूरज चव्हाण ठरला ‘बिग बॉस मराठी 5’ चा विजेता
Bigg Boss Marathi 5 Winner : लोकप्रिय रियलिटी शो बिग बॉस मराठी 5 चा (Bigg Boss Marathi 5) विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला आहे. सुरज चव्हाण, अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) , निकी तांबोळी (Niki Tamboli) हे तीन स्पर्धक बिग बॉसचे टॉप 3 स्पर्धक ठरले होते. मात्र सुरज चव्हाणने अभिजीत सावंत आणि निकी तांबोळीला मात देत बिग बॉस मराठी 5 चा विजेता बनला आहे.
बिग बॉस मराठी 5 च्या पहिल्या दिवसापासून सूरज चव्हाणला चाहत्यांकडून फूल सपोर्ट मिळत होता. सूरज देखील आपल्या वेगळ्या स्टाइलने प्रेक्षकांची मने जिंकत होता. जेव्हा बिग बॉसने सूरज आणि अभिजीतला घराचे दिवे बंद करून तसेच आपल्या नावांच्या पाट्या घेऊन या घराचा निरोप घ्यावा असं आदेश दिले तेव्हा सूरज प्रचंड भावुक झाला होता.
‘बिग बॉस मराठी’च्या या गाजलेल्या पर्वाचा महाविजेता सूरज चव्हाण म्हणाला,”हे सगळं स्वप्नवत आहे माझ्यासाठी… माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. बिग बॉस मराठी’साठी विचारणा होताच मी लगेचच होकार दिला होता. या घराने मला अनेक गोष्टी शिकवल्या. एक चांगला माणूस बनण्याचा मी प्रयत्न केला. प्रेक्षकांना मी भावलो. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच ‘बिग बॉस मराठी’चा मी महाविजेता ठरलोय. सर्वच प्रेक्षकांचे मनापासून खूप-खूप आभार. या मंचाने मला खूप काही दिलंय. मी आयुष्यभर प्रेक्षकांचा ऋणी राहीन”.
बिग बॉस मराठी 5 मध्ये 16 स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यापैकी अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता प्रभू वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली होती.
‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याला रितेश भाऊंनी ‘चार चाँद’ लावले. आपल्या धमाकेदार सादरीकरणाने त्यांनी ‘बिग बॉस मराठी’च्या भव्यदिव्य महाअंतिम सोहळ्याचा मंच दणाणून सोडला. गेले दोन आठवडे ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश भाऊंची कमतरता जाणवली होती. पण या महाअंतिम सोहळ्याला त्यांनी ही सर्व कसर भरून काढली. आपल्या हटके स्टाईलने त्यांनी महाअंतिम सोहळ्याची शोभा वाढवली.
View this post on Instagram
तर दुसरीकडे ट्रॉफी न घेता जान्हवीने खेळातून एक्झिट घेत 9 लाख रुपये कमवले. यावेळी जान्हवी भावुक होत म्हणाली, “मी उद्धट बोलले, मोठ्यांचा अपमान केला. मला माहितीये की, लोकांचा राग शांत झालेला नाहीये. हा गेम आहे आणि हा बिग बॉसने दिलेला एक टास्क आहे. टास्क पूर्ण नाही केला, तर बिग बॉस चिडतात. मी प्रायश्चित म्हणून हा बझर वाजवते आणि हा खेळ सोडते.
कोथरूडमध्ये अमोल बालवडकर यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन, चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध थोपटले दंड