अभिजीत-गौतमीच्या AI व्हिडीओने वेधलं लक्ष! लवकरच दिसणार एका खास अंदाजात

Abhijeet Sawant आणि गौतमीचा एआय लूकमधल्या व्हिडिओने त्यावर शिक्कमोर्तब केला आहे की, ते दोघे एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत.

Abhijeet Sawant

Abhijeet Sawant and Gautami Patil AI video attracts attention! Will be seen soon in a special look : निळशार समुद्र, नारळाच्या बागा आणि अभिजीत गौतमीचा एआय लूक मधला व्हिडिओ सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी गौतमी ने अभिजीत सावंत सोबतचा एक सेल्फी सोशल मीडिया वर शेयर केला होता आणि कमिंग सून असं साजेस कॅप्शन देखील या फोटोला दिलं होत तेव्हा प्रेक्षकांनी हे दोघं सोबत नवीन प्रोजेक्ट करणार असल्याचा अंदाज लावला होता आणि आजच्या या व्हिडिओने त्यावर शिक्कमोर्तब केला आहे.

भूमिपूजन, प्राणप्रतिष्ठा अन् ध्वजारोहण, राममंदिराची सर्व कार्य अभिजित मुहूर्तावरच का?

2025 वर्ष गायक अभिजीत सावंतसाठी अगदीच खास असून या वर्षात त्याने अनेक ट्रेंडिंग गाणी केली. संगीत विश्वात 20 वर्ष पूर्ण करून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोहित केलं. कायम एव्हरग्रीन गायक असलेला अभिजीत पुन्हा एकदा चर्चेत आला आणि त्याने नुकतंच आतच्या तरुणाईसाठी मोहब्बत लुटाऊंगा या त्याचा सदाबहार गाण्याचं नवं कोर व्हर्जन देखील गायलं.

थिटेंच्या मागील शक्तीने आमच्या बदनामीचं षडयंत्र रचलं; अजित पवारांचं नाव न घेता राजन पाटलांचे गंभीर आरोप

अभिजीतने आजवर त्याचा आवाजाने आणि बिग बॉस मधल्या कमाल खेळीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे येणाऱ्या काळात देखील तो अनेक वैविध्यपूर्ण आणि कमाल प्रोजेक्ट्सचा भाग होणार आहे. इंडियन आयडॉल ते आजच्या पिढीला साजेशी ट्रेंडिंग गाणी देणारा तरुणाईचा लाडका गायक ठरतोय. गौतमी सोबत आता अभिजीत कोणतं नवीन गाणं करतोय ? हा प्रश्न प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा असला तरी लवकरच याच उत्तर प्रेक्षकांना मिळणार असल्याचं कळतंय.

follow us