गौतमी ते राधा… महाराष्ट्रात ‘या’ स्टेज डान्सर्सची तुफान क्रेझ!
यंदाच्या दहीहंडीनंतर काही नृत्य कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय स्टेज डान्सर्स पुन्हा चर्चेत आल्या.
Stage dancers who took Maharashtra by storm! : दहीहंडीचा थरार… डीजेचा दणदणाट… हजारोंची गर्दी आणि स्टेजवर नृत्यांगनांचा जलवा… गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सवात स्टेज डान्सर्सचं आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. मात्र यंदाच्या दहीहंडीनंतर काही नृत्य कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडले आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय स्टेज डान्सर्स पुन्हा चर्चेत आल्या.
-
शुभांगी थोरात
महाराष्ट्रातील स्टेज डान्सच्या सर्किटमध्ये चर्चेत असलेलं आणखी एक नाव.
विविध कार्यक्रमांतील स्टेज परफॉर्मन्समधून शुभांगी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे.
पुण्यातील दहीहंडी प्रकरणात निशा मुंबईकरसह शुभांगीचंही नाव समोर आलं.
-
नमिता पाटील
महाराष्ट्रातील स्टेज शोमध्ये पाहायला मिळणारं आणखी एक नाव.
विविध सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांतील स्टेज परफॉर्मन्सच्या माध्यमातून नमिता प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
सोशल मीडियावरही तिच्या नृत्याची चर्चा पाहायला मिळते.
-
निशा मुंबईकर
स्टेज शोच्या माध्यमातून महाराष्ट्रात चर्चेत आलेली नृत्यांगना.
दहीहंडी आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तिचे स्टेज परफॉर्मन्स पाहायला मिळतात.
पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमासंदर्भात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे सध्या निशाचं नाव चर्चेत आहे.
-
स्नेहा पिंपरीकर
स्टेज परफॉर्मन्सच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करणारी नृत्यांगना.
विविध कार्यक्रमांमधील नृत्य आणि सोशल मीडिया कंटेंटच्या माध्यमातून स्नेहा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.
ज डान्सच्या नव्या पिढीतील चर्चेत असलेल्या नावांपैकी ती एक आहे.
-
ऐश्वर्या जाधव
स्टेज डान्स आणि सोशल मीडियामुळे लोकप्रिय होत असलेलं नाव.
तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात.
दहीहंडीनिमित्त पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या तिच्या एका प्रस्तावित नृत्य कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
-
हिंदवी पाटील
सोशल मीडिया आणि स्टेज शोमधून लोकप्रिय झालेली नृत्यांगना.
स्टेजवरील परफॉर्मन्ससोबतच सोशल मीडियावरील व्हिडिओंमुळे हिंदवीने आपला स्वतंत्र चाहता वर्ग तयार केला आहे.
चित्रपटातील लावणीपर्यंतही तिचा प्रवास पोहोचला आहे.
-
राधा पाटील
गेल्या काही काळात स्टेज शोमुळे वेगाने चर्चेत आलेलं नाव.
महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांमधील तिच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावरही चर्चेत असतात.
यंदा पुण्यातील दहीहंडी कार्यक्रमासंदर्भात गुन्हा दाखल झाल्याने राधा चर्चेत आली.
-
गौतमी पाटील
महाराष्ट्रातील स्टेज शोमधील सर्वाधिक चर्चित नावांपैकी एक.
दहीहंडी, यात्रा-जत्रा आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गौतमीच्या डान्सची मोठी क्रेझ पाहायला मिळते.
यंदाच्या दहीहंडीतील कार्यक्रमानंतरही गौतमी पुन्हा चर्चेत आली.







