Bigg Boss Marathi: घरात सूरजला मिळणार सुखद धक्का; आत्या अन् बहिणींना पाहताच पाणावले डोळे
Bigg Boss Marathi Season 5 Day 62 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील (Bigg Boss Marathi Season 5) लक्षवेधी चेहरा म्हणजे सूरज चव्हाण (Suraj Chavan). सूरजने आपल्या स्टाईलने प्रेक्षकांना चांगलच खिळवून ठेवलं आहे. (Bigg Boss Marathi) त्याची प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असते. (Bigg Boss Marathi New Promo) आजच्या भागातही तो प्रेक्षकांना रडवताना दिसून येईल. त्यामुळे सूरजसह प्रेक्षकदेखील भावूक झालेले आजच्या भागात पाहायला मिळतील.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या नवा प्रोमो सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ म्हणत आहेत,”सूरज स्वागत करुयात आपल्या बहिणींचं आणि आत्यांचं”. सूरजच्या बहिणी आणि आत्या त्याला म्हणत आहेत,”तुझ्यामुळे आज आम्हाला इथपर्यंत यायला मिळालं आहे. सूरजला ‘बिग बॉस मराठी’च्या आलिशान घरात पाहून त्याच्या बहिणींना आणि आत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
डीपीने निक्कीची मागितली माफी
डीपी दादा निक्कीला वेगळ्या नावाने हाक मारत असल्याचं तिला पटत नाही आहे. त्याबद्दल तिने डीपी दादांना देखील सांगितलं. निक्की म्हणतेय, “लोक मला त्या माझ्या नावाने ओळखतात”. डीपी दादा पुढे निक्कीची माफी मागतात. डीपी दादा म्हणतात, “माझं हे इंटेशन नव्हतं. मी मनापासून तुझी माफी मागतो. मोठा भाऊ समजून मला माफ कर”. निक्की पुढे डीपी दादांना काळजी घेण्याचा सल्ला देते.
Bigg Boss Marathi : सूरज आणि पॅडीची जोडी भेदू शकेल का घरातील महाचक्रव्युह?
सूरजने सांगितली आजोबांची गोष्ट
सुरज म्हणाला,”माझे आजोबा खूप मोठे पैलवान होते. गावामध्ये कोणी त्यांचा नाद नाही करायचे. बाकीचे पैलवान आजोबांचा पाय हलवण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांचा पाय अजिबात हलायचा नाही. बाकी सगळे दमायचे मग आजोबा त्यांना धरून खाली जमिनीवर पाडायचे. आजोबा एकटे पाच गावांवर भारी पडायचे . गावकऱ्यांनी पैलवान चांगला आहे म्हणून माझ्या आजोबांसाठी एक म्हैस बक्षीस म्हणून दिली होती.”