Gadar 2चा सस्पेन्स उघड केल्यामुळे अमीषा पटेल ट्रोल; म्हणाले, “तू वेडी आहेस का?”

Ameesha Patel Trolled: सध्या सिनेमाचे प्रमोशन हे जोरदार चालत असल्याचे दिसून येत आहे. (Gadar 2) त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा देखील जोरदार रंगत असते. (Gadar 2 Hindi Movie) आता सिनेमाच्या प्रमोशनचे फंडे देखील खूपच बदलत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे कधी कोण कशाप्रकारे आपल्या सिनेमाचे प्रमोशन करेल याचा काहीच नेम नाही. परंतु सध्या लोकप्रिय अभिनेत्री अमिषा […]

Gadar 2 Teaser

Gadar 2 Teaser

Ameesha Patel Trolled: सध्या सिनेमाचे प्रमोशन हे जोरदार चालत असल्याचे दिसून येत आहे. (Gadar 2) त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा देखील जोरदार रंगत असते. (Gadar 2 Hindi Movie) आता सिनेमाच्या प्रमोशनचे फंडे देखील खूपच बदलत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे कधी कोण कशाप्रकारे आपल्या सिनेमाचे प्रमोशन करेल याचा काहीच नेम नाही. परंतु सध्या लोकप्रिय अभिनेत्री अमिषा पटेलला (Ameesha Patel) आपलं हे प्रमोशन करणं चांगलंच महागात पडलं आहे. तिनं आपल्या आगामी सिनेमाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.


परंतु तिच्या या पोस्टमुळे ती मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली आहे. तिने तिच्या आगामी ‘गदर 2’. आगामी सिनेमाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. तुम्ही म्हणाल की असं नक्की तिला ट्रोल करायला नेमकं काय झालंय? २०११ मध्ये आलेल्या ‘गदर’ या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. हा सिनेमा तेव्हा खूपच गाजला होता. या सिनेमाला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचा बघायला मिळाला होता. आता तब्बल २२ वर्षांनी या सिनेमाचा पुढचा भाग आला आहे.

‘गदर 2’ या सिनेमाची सर्वांनाच मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात ११ ऑगस्टला चाहत्यांच्या पुन्हा भेटीला येणार आहे. त्यामुळे सनी देओल आणि अमिषा पटेलच्या चाहत्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यावेळी या दोघांची कमेस्ट्री चाहत्यांना प्रचंड प्रमाणात आवडली होती. आता ही जोडी परत एकदा रुपेरी पडद्यावर आली आहे. चला तर मग जाणून घेऊया की आता नक्की अशी अमीषा पटेलनं काय चूक केली आहे.

‘गदर: एक प्रेम कथा’या सिनेमाच्या ट्रेलरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सिनेमाचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. त्यात सनी देओलच्या स्मशानभूमीतील सीननं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. परंतु याचे रहस्य स्वत: अमिषा पटेलनं उलगडले आहे. त्यामुळे तिला चाहत्यांनीच चांगलंच ट्रोल केले आहे. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol) तारा सिंग तर अमीषा पटेल ही सकीनाची भुमिका साकारत असल्याचे दिसून येत आहे. त्या स्मशानभूमीच्या सीनमुळे आता सकीनाचा शेवट या सिनेमातून दाखवण्यात आला आहे का? त्यामुळे सकीनाच्या जाण्यानं आता तारा सिंग तिच्या आठवणीत रडणार आहे का? अशा प्रकारची जोरदार चर्चा सुरू झाली होती.

Ravi kishan: सुप्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्याची लेक होणार भारतीय सैन्यात भरती; जाणून घ्या तिच्याबद्दल

परंतु अमीषा पटेलच्या त्या पोस्टनं मात्र पोटातलं सर्व काही बाहेर पडलं आहे, आणि मग तिला चांगलाच ट्रॉल करण्यात आले आहे. तिनं या पोस्टमध्ये लिहिलंय आहे की, माझ्या प्रिय फॅन्सना मला सांगायचंय की, ‘तुम्हाला असंच वाटतं होतं ना की मी गदर 2 मध्ये म्हणजे सकीना मरते. पण तसं नाही. काय माहिती ही कदाचित सकीना नसेलच. काळजी करू नका… खूप प्रेम सर्वांना’ अशी पोस्ट केल्याने अमीषाला मात्र चांगलंच ट्रोल करण्यात आले आहे. अगोदर सस्पेन्स का रिव्हिल केलं म्हणून तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे.

Exit mobile version