Download App

अभिनेत्री हिलेरी स्वँक झाली जुळ्या मुलांची आई, फोटो शेअर करत म्हणाली…

  • Written By: Last Updated:

Hilary Swank : मनोरंजन विश्वातील कलाकार सध्या रोजच नवनवीन खुशखबर देत आहेत. बिपाशा बासू नंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री (actress) देबिना बॅनर्जीही दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बालिका वधू फेम नेहा मर्दाने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. आता प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री हिलेरी स्वँक (Hilary Swank) हिच्या घरी देखील नव्या जुळ्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.


हिलेरी स्वँक ४८व्या वर्षी आई झाली आहे. तिने दोन जुळ्या मुलांना जन्म (Twins) दिला आहे. हिलेरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन (Instagram account) या जुळ्या मुलांसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हिलेरी समुद्रकिनारी आपल्या जुळ्या मुलांना घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. या फोटोला तिने “हे माझ्यासाठी सोपं नव्हतं. पण माझ्या छोट्या मुलगा आणि मुलीने हे शक्य केलं. हॅपी इस्टर,” असं या फोटोला कॅप्शन देखील दिले आहे.

हिलेरी स्वँकच्या या पोस्टनर बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने देखील कॉमेंट्स केले आहे. बिपाशाने कॉमेंट्स मध्ये हिलेरीचं अभिनंदन असे लिहिले आहे. हिलेरीच्या कुटुंबामध्ये याअगोदर देखील जुळ्या मुलांनी जन्म घेतल्याचे तिने सांगितले होते. हिलेरीची आजीही तसेच तिच्या पतीच्या पंजीने देखील जुळ्या लेकराना जन्म दिला होता, असं हिलेरीने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते.

Akshay Kumar : 55 वर्षीय खिलाडीला शर्टलेस होऊन डान्स करणं पडलं महागात; व्हिडीओ पाहून चाहते भडकले

हिलेरीने २०१८मध्ये फिलिपसोबत लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. २०२२च्या डिसेंबर महिन्यामध्ये तिने गरोदर असल्याची न्यूज चाहत्यांना दिली होती. हिलेरीने ख्रिसमस ट्रीसोबत बेबी बंप फ्लाँट करताना फोटो शेअर करण्यात आला होता.

Tags

follow us