Download App

Amitabh and Rajanikath : 33 वर्षांनी एकत्र दिसणार थलाईवा अन् बिग बी; चित्रपटाच्या शुटींगला सुरवात

Amitabh and Rajanikath : अभिनेते अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत ( Amitabh-Rajanikath ) यांचं एकत्र येणं म्हणजे चित्रपट चाहत्यांसाठी एक खास पर्वणीच म्हणावी लागेल. या जोडीने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि प्रक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यात त्यांनी स्वतः च एक अढळ स्थान या इंडस्ट्रीत निर्माण केलं आहे. ज्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही.

वारकरी संप्रदायावर शोककळा : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

33 वर्षांनी एकत्र दिसणार…

त्यात आता हे थलाईवा अन् बिग बी तब्बल 33 वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. या अगोदर 1991 ला ते मुकुल एस आनंद यांच्या दिग्ददर्शनात बनलेल्या ‘हम’ चित्रपटात दिसले होते. त्यांच्या या आगामी चित्रपटाचं शुटींग देखील सुरू झाले आहे. हा चित्रपट टीजे ज्ञानवेल व्दारे दिग्दर्शित असणार आहे. तसेच ‘थलाईवर 170’ असं या चित्रपटाचं नाव आहे. तर अभिनेते अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार रजनीकांत या दोघांनी देखील याबद्दल त्यांच्या सोशल मिडीयावर माहिती दिली आहे.

काय म्हणाले अभिनेते अमिताभ बच्चन?

इंस्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांनी ग्रे कलरचा सूट आणि हातात भिंग घेत एक फोटो शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्यांनी लिहिले की, या क्षणाला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. 33 वर्षांनंतर द थलाईवा रजनीकांत सरांसोबत काम करण्याचा पहिला दिवस आहे. तसेच त्यांनी रजनीकांत सोबतही फोटो शअर केला. त्यांनी लिहिले की, द थलाईवा व्हॉट एन ऑनर.

काय म्हाणाले सुपरस्टार रजनीकांत?

दुसरीकडे रजनीकांत यांनी देखील आपल्या या चित्रपटाबद्दल सोशल मिडीयावर माहिती दिली. यामध्ये त्यांनी देखील अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तर कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ’33 वर्षांनंतर मी माझे गुरू श्री अमिताभ बच्चन यांच्यासह टीजे ज्ञानवेल व्दारे दिग्दर्शित आगामी ‘थलाईवर 170’ मध्ये पुन्हा करणार आहे. माझं ह्रदय आनंदाने धडधडत आहे.

Tags

follow us