Download App

 Amitabh Bachchan अन् किंग खान दिसणार एकत्र; आगामी प्रोजेक्टची आणखी एक झलक पाहिलात का?

  • Written By: Last Updated:

Amitabh Bachchan Shah Rukh Khan: बॉलीवूडचे (Bollywood) दोन्ही डॉन अर्थात बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि शाहरुख खानच्या ( Shah Rukh Khan) यांच्या स्टारडमची तुलना कोणत्याच दुसऱ्या स्टारशी होऊ शकत नाही. गेल्या काही दिवसापासून बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन आणि किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खान यांचा एक खास फोटो सोशल मीडियावरसध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. आता त्यानंतरअजून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. बॉलीवूडचे हे दोन मोठे स्टार नक्की कुठे धावत जात आहे? याचं कुतूहल सगळ्यांना आहे.

आता हे नक्की कुठे धावत चालले आहेत हे बघण चाहत्यांना उत्सुकतेच ठरणार आहे. आगामी प्रोजेक्टबद्दल कोणतीही माहिती न देता हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिला फोटो प्रदर्शित होताच दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि किंग खान १७ वर्षांनंतर एकत्र स्क्रीन शेअर करणार असल्याचे सांगितल्यापासून चांगलीच खळबळ उडाली आहे. पहिला फोटो प्रदर्शित झाला, तेव्हा किंग खानने सोशल मीडियावर देखील शेअर केले आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करताना त्याला किती मजा येणार आहे आणि तो या प्रोजेक्टसाठी उत्सुक त्याने यावेळी सांगितली होती.

Gadar 2 Songs | गदर-2 मधील गाणे उदीत नारायण यांनीच का गायले? LetsUpp Marathi

दोघांचे एकत्र सिनेमा
मिळालेल्या माहितीनुसार, एका आगामी प्रोजेक्टमध्ये बिग बी आणि किंग खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. या प्रोजेक्टबद्दल अद्याप फारशी माहिती नसली तरी, लवकरच यासंदर्भातल्या अपडेट्स समोर येतील.मनोरंजन क्षेत्रासाठी ही सर्वात मोठी बातमी आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या दोघांनी यापूर्वी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम आणि कभी अलविदा ना कहना यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.

Kiran Mane: किरण मानेंकडून किंग खानचं तोंडभरुन कौतुक; म्हणाला, “अख्ख्या देशानं घरात…”

डॉनमध्ये कॅमिओ करणार का?

बिग बी आणि किंग खान पुन्हा एकदा एकत्र येण्याची बातमी समोर येताच, चाहत्यांनी ते डॉन 3 मध्ये कॅमिओ करणार की नाही असे अंदाज बांधले आहेत. डॉन 3 ची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक फरहान अख्तरने केली होती.नव्या भूमीकेत रणवीर सिंग डॉनची भूमिका साकारणार आहे . डॉन फ्रँचायझी यापूर्वी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान करत होते.

Tags

follow us