Download App

Amitabh Bachchan यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं गिफ्ट; या चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच

Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त त्यांच्या आगामी चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट मिळालं आहे.

वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा विजय, अफगाण संघाला 8 विकेटने हरवले

आगामी चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच!

‘कल्कि 2898 एडी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर या चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी चाहत्यांना गिफ्ट मिळालं आहे. यामध्ये अमिताभ हे एका गुहेत उभे आहेत. त्यांच्या मागून सुर्यप्रकाश पडलेला दिसत आहे. मात्र यामध्ये बच्चन यांचा चेहरा झाकलेला आहे. त्यांनी हातात काठी, कुर्ता, धोतर आणि शाल या लूकमध्ये ते दिसत आहेत.

Sharad Pawar : पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे सावध होत फडणवीसांनी शिवसेनेला… छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

तसेच हे पोस्ट लॉंच करताना सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीमने लिहिले की, ‘आम्हाला तुमच्या प्रवासाचा भाग होण्याचा अभिमान आहे. तसेच तुमच्या महानतेचे आम्ही साक्षीदार झालो आहोत. वाढदिवसाच्या शुभेच्छा अमिताभ बच्चन सर’ दरम्यान हा चित्रपट वैजयंती मुवीज यांचा आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून ‘कल्कि 2898 एडी’ या चित्रपटाचं पोस्टर लॉंच करण्यात आले आहे.

Tags

follow us