Sharad Pawar : पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे सावध होत फडणवीसांनी शिवसेनेला… छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Sharad Pawar : मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांबाबत (Sharad Pawar) एक गौप्यस्फोट केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार यांच्या गटातील आमदारांनी आणि विशेषतः छगन भुजबळांनी शरद पवारांबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यामध्ये त्यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना 2014 च्या शरद पवारांच्या भाजपच्या पाठिंब्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे.
हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; मुख्य दोन फरार आरोपी पोलिसांकडून जेरबंद
काय म्हणाले छगन भुजबळ?
2014 साली विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळी शिवसेना भाजपने युती तोडली. तेव्हा भाजपने पवारांना सांगितल की, आम्ही शिवसेनेला सोडतो. तुम्ही कॉंग्रेसला सोडा. त्यामुळेच राष्ट्रवादीने कोणतही कारण नसताना कॉंग्रेसला सोडलं. पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा पाठिंबा काढला. तेव्हा अस ठरल होत की, स्वतंत्र निवडणूक झाल्यानंतर काही दिवस भाजपचं सरकार चालेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील होईल.
महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नका, ड्रग्ज प्रकरणावरून पटोलेंनी शिंदे सरकारला सुनावलं
तसेच मतमोजणीच्या आदल्या दिवशी सुद्धा भाजपचा फोन आला. की, उद्या मतमोजणी आहे. जर कमी मत पडली तर राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा द्यावा त्याला शरद पवार हो म्हटले. तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी सरकारला पाठिंबा जाहिर केला. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर शरद पवारांनी एक वक्तव्य केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस सावध झाले.
पवारांचं ते वक्तव्य अन् फडणवीस सावध…
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत एक वक्तव्य केल की, भाजपने आमचा पाठिंबा कायमसाठी गृहीत धरू नये. त्यांच्या या वक्तव्याने फडणवीस सावध झाले. त्यांनी समजून घेतलं की, काही तरी गडबड आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेशी युती कायम ठेवत त्यांना मंत्रिपदं दिली. अशा प्रकारे पवारांनी भाजपशी युती किंवा त्यांना पठिंबा दिला नाही. असा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.