हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; मुख्य दोन फरार आरोपी पोलिसांकडून जेरबंद

हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण; मुख्य दोन फरार आरोपी पोलिसांकडून जेरबंद

Heramb Kulkarni : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अहमदनगर येथील सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्या शनिवारी प्राणघात हल्ला झाला होता. या हल्लातील तिघांना पोलिसांनी अटक केली होती. तर दोन आरोपी फरार होते. तोफखाना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्या दोन्ही फरार आरोपींना जेरबंद केले आहे. हेरंब कुलकर्णी यांना रस्त्यात अडवून लोखंडी गजाने मारहाण केली होती. यानंतर सर्वच क्षेत्रातून पोलिसांवर दबाव आला होता. त्यानंतर वेगाने सूत्र हालवून पोलिसांनी फरार आरोपींचाही शोध घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोफखाना पोलीस स्टेशन भा.दि.व कलम 307, 341, 324, 323, प्रामणे दाखल गुन्ह्यात फरार असलेले असलेले आरोपी सनी ज्ञानेश्वर जगधने (वय 24) रा. रंगभवन सर्जेपुरा आणि अक्षय कैलास माळी (वय 20) रा. सर्जेपुरा यांना पोलीसांनी सापळा रचून अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना शुक्रवार 13 ऑक्टोबरपर्यत पोलीस कोठडी रिमांड दिली आहे.

Israel-Hamas War : ….तर इस्त्रायलाचाच सर्वनाश होईल; तुर्की राष्ट्राध्यक्षांचा इशारा

ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडें यांच्या मार्गदर्शना खालील पो.नि. मधुकर साळवे, पो. उपनिरी सचिन रणशेवरे, पो.हे.कॉ. दत्तात्रय जपे, पो.हे.कॉ. सुनिल शिरसाट, पो.ना. संदिप धामणे, पो.ना. अविनाश वाकचौरे, पो.ना. वसीम पठाण, पो.ना. अहमद इनामदार, पो.ना. सुरज वाबळे, पो.कॉ. सचिन जगताप, पो.कॉ. शिरीष तरटे, पो.कॉ. भवर, पो.कॉ. सतिष त्रिभुवन, संदिप गिऱ्हे, पो.कॉ. बाळासाहेब भापसे, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते, सतिष खोमणे यांनी केला. पुढील तपास मपोसई शुभांगी मोरे या करत आहेत.

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग स्थापन करणार, CM शिंदेंची घोषणा

दरम्यान, आजारी असल्याने शनिवारी दुपारी शाळेतून सुनिल कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या गाडीवरुन हेरंब कुलकर्णी घरी येत होते. त्यावेळी रासने नगर जवळ जोशी क्लासेसजवळ तीन तरुणांनी गाडी अडवून लोखंडी रॉडने त्यांना मारहाण केली. लोखंडी रॉडने दोन्ही पायावर, दोन्ही हातावर पाठीवर आणि डोक्यात रॉडने मारहाण केली होती. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला इजा झाली होऊन 4 टाके पडले. डोक्यावरचा दुसरा फटका सुनिल कुलकर्णी यांनी हाताने अडवला त्यामुळे ते बचावले. डोक्यावर जबर मार बसल्याने ते रस्त्यावर पडले. हल्ल्यानंतर त्यांनी सिव्हील हॉस्पिटलला उपचार घेतले त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात त्यांनी गुन्हा दाखल केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube