मुंबई : बॉलिवूडचे जेष्ठ्य अभिनेते अमिताभ बच्चन हे शूटिंग दरम्यान जखमी झाले आहेत. हैदराबादमध्ये शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होते.
या अपघातामध्ये त्यांच्या बरगड्यांना मार लागला आहे. हैदराबादमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडिने मुंबईला पाठवण्यात आले. आता ते आपल्या घरी आराम घेत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा ब्लॉगद्वारे माहिती दिली की, सुरूवातीला ज्यांनी माझ्या दुखापतीवर चिंता व्यक्त केली त्या सर्वांचे धन्यावाद. मी आराम करा, पट्टी बांधा, काम बंद झाले आहे. डॉक्टरांच्या या सुचनांचं पालन करत आहे. प्रकृती ठीक व्हायला वेळ लागेल. पण सर्वांचे धन्यावाद अशा शब्दांत त्यांनी आपल्या प्रकृतीची माहिती दिली.
सोमवारी हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान आपण जखमी झाल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी स्वतः दिली. त्यांनी ब्लॉगवरून ही माहिती दिली होती. त्यांनी यामध्ये लिहीले की,‘बरगडीच्या स्नायू फाटला आहे. शूटिंग रद्द करण्यात आले आहे. त्यावर प्रथमोपचार करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खूप त्रास होतोय. हालचाल करण्यात अडचण येत आहे. श्वास घेण्यासही त्रास होतो. मझ्यावर उपचार सुरू आहेत. बरे होण्यासाठी काही आठवडे लागतील.’ असं ते म्हणाले. आता चाहत्यांकडून अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
Amitabh Bachchan यांना दुखापत, हैदराबादमध्ये शूटिंग दरम्यान घडली घटना
या अगोदर देखील कुली चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते जखमी झाले होते. त्यावेळी देखील अॅक्शन सीनचं शूटिंग करताना जखमी झाले होते. त्यानंतर आता पुन्हा ते दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना जखमी झाले आहेत.