Download App

Breaking: अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा खालावली, पोस्टने चाहते चिंतेत

Amitabh Bachchan Admitted In Kokilaben Hospital: बॉलिवूडचे (Bollywood) बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बींची तब्येत बिघडल्याचे सांगण्यात येत असून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital ) दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी (Angioplasty ) करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बिग बीं ची एक्स वर पोस्ट 

मिळालेल्या माहितीनुसार कडक सुरक्षेत बिग बींना आज पहाटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. “नेहमी कृतज्ञता”, अशी पोस्ट त्यांनी यावेळी सोशल मीडियावर केली आहे.

 

अमिताभ यांनी जलसाबाहेर घेतली चाहत्यांची भेट

अमिताभ बच्चन यांचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे आणि त्यांचे चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. बिग बींच्या घराबाहेर त्यांना भेटण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली आहे. अमिताभ बच्चनही दर रविवारी त्यांच्या घराबाहेर चाहत्यांना भेटतात. काल अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना भेटतानाची ही फोटो त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केली होती. त्यासोबत बिग बींनी ‘हंबल्ड बियॉन्ड’ असे लिहिले होते.

बिग बींनी अभिषेकसोबत आपल्या टीमचा विजय साजरा केला: बिग बींनी नुकताच मुलगा अभिषेक बच्चनसोबत आयएसपीएलमध्ये आपल्या टीमचा आनंद साजरा केला होता. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL)ची उद्घाटन आवृत्ती सुरू आहे. गुरुवारी, 14 मार्च रोजी, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या टीम मुंबईने चेन्नई सिंगम्सचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर दोन्ही कलाकारांनी आपापल्या टीमसोबत विजय साजरा केला.

अहान पांडे करणार अभिनयात पदार्पण; ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर करणार काम

अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट: वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत. तो लवकरच प्रभास आणि दीपिका पदुकोण स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ मध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. बिग बींचा शेवटचा रिलीज झालेला टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननचा ‘गणपत’ होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला होता.

follow us

वेब स्टोरीज